• Home
  • »
  • News
  • »
  • crime
  • »
  • भाऊबीज करुन परतताना काळाचा घाला; भाऊ-बहिणीने जागीच सोडला जीव

भाऊबीज करुन परतताना काळाचा घाला; भाऊ-बहिणीने जागीच सोडला जीव

भाऊबीजेच्या सणाच्या दिवशी दोघा सख्ख्या बहीण-भावांचा झालेल्या मृत्यूच्या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

  • Share this:
सांगली, 6 नोव्हेंबर : भाऊबीजेच्या (BhauBeej 2021) दिवशी झालेल्या भीषण अपघातात बहीण-भाऊ ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मोठ्या बहिणीच्या घरी भाऊबीज आटपून घरी परतणाऱ्या लहान बहीण-भावाचा जत तालुक्यातल्या दरिकोनुर या ठिकाणी क्रुझर गाडीला जोरदार धडक दिल्याने दुर्देवी अपघात (Road Accident) झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जत तालुक्यातल्या दरीबडच्या नजीक असणाऱ्या दरिकोनुर या ठिकाणी क्रुझर आणि दुचाकी गाडीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये भाऊ आणि बहीण दोघे जण ठार झाले आहेत. भाऊबीजेच्या दिवशी बहीण-भावांचा हा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अक्षय श्रीमंत चौगुले, वय 20 आणि त्याची बहीण काजल श्रीमंत चौगुले, वय 16 असे ठार झालेल्या बहिण-भावांची नावे आहेत. (sangali news Brothers and sisters death in road accident) हे ही वाचा-3 वर्षांचा संसार अर्ध्यावर मोडला; पत्नीनंतर पतीनंही संपवलं जीवन, हृदयद्रावक घटना विशेष म्हणजे भाऊबीजेच्या निमित्ताने मोठ्या बहिणीच्या घरी हे दोघेही बहिण-भाऊ दुचाकीवरून पंढरपूर येथील व्हेळ या बहिणीच्या गावी गेले होते. त्यानंतर भाऊबीज आटपून दोघेही दरीबडची आपल्या गावी परतत होते. अवघ्या एक किलोमीटरवर गाव असताना दरीकोन्नूर या ठिकाणी समोरून येणाऱ्या भरधाव क्रुझर गाडीला धडक बसली. ज्यामध्ये 30 फुट गाडीसह दोघे फरफटत गेल्याने दोघा बहीण-भावाचा जागीच मृत्यू झाला. भाऊबीजेच्या सणाच्या दिवशी दोघा सख्ख्या बहीण-भावांचा झालेल्या मृत्यूच्या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
Published by:Meenal Gangurde
First published: