मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /कुटुंबीयांना केला मेसेज, चार वर्षांपासून पगार थकला, PSI ने उचललं टोकाचं पाऊल

कुटुंबीयांना केला मेसेज, चार वर्षांपासून पगार थकला, PSI ने उचललं टोकाचं पाऊल

मुंबईत एका पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

मुंबईत एका पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

मुंबईत एका पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 30 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या तसेच इतरही गुन्ह्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. यातच आता मुंबईतून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तब्बल 4 वर्षांपासून पगार थकल्यामुळे एका पोलीस उपनिरीक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

प्रकाश काशिनाथ थेतले, असे आत्महत्या केलेल्या पीएसआय अधिकाऱ्याचे नाव आहे. प्रकाश काशीराम हे मुंबईतील चुनाभट्टी परिसरात राहत होते. मागील चार वर्षांपासून त्यांना पगार मिळत नव्हता. ते नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलीस ठाण्यात कार्यरत होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी मुंबईत बदलीवर आले होते.

यासोबतच गेल्या अनेक महिन्यांपासून म्हणजे मे 2022 पासून प्रकाश थेतले हे टीबीच्या आजाराने त्रस्त होते. त्याना उपचारासाठी पैसे जमा करण्यात अपयश आल्यामुळे त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी प्राथमिक अहवालावरून गुन्हा दाखल केला आहे. तसेच अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा - गर्लफ्रेंडसोबतच्या भांडणात 50 लाखांची मर्सिडीज जळून खाक, तरुणाने डोक्याला लावला हात

प्रकाश काशीराम यांनी आत्महत्येपूर्वी त्यांच्या कुटुंबीयांना काळजी घ्या असा मेसेज पाठवला आणि नंतर गळफास घेत आले जीवन संपवले. त्यांना दारूचेही व्यसन होते. ते नेहमी गैरहजर राहत होते. कोपर खैने पोलीस ठाण्यातून 29 नोव्हेंबर 2022 रोजी बदलीवर मुंबई शहर येथे बदलून आले होते. यानंतर 29 जानेवारी रोजी रात्री चुनाभट्टी येथील त्यांच्या राहत्या घरी असताना कुटुंबियांना take care असा मेसेज केला. यानंतर गळफास घेऊन आत्महत्या करत आपले जीवन संपवले.

आत्महत्येपूर्वी प्रकाश थेतले यांनी एक चिठ्ठीदेखील लिहिली होती. यात कामात वरिष्ठांचे सहकार्य लाभले असा उल्लेख आहे, अशी माहिती चुनाभट्टी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देसाई यांनी दिली आहे. दरम्यान, प्रकाश थेतले यांच्या आत्महत्येच्या या घटनेनंतर मदत स्वरूपात म्हणून 32000 रूपये त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आलेत आहेत, अशी माहितीही मिळाली आहे.

First published:

Tags: Crime news, Mumbai police