नवी दिल्ली, 23 मे: ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार (Sushil Kumar) गेल्या काही दिवसांपासून फरार आहेत. दरम्यान आता त्याच्या अटकेबाबत सस्पेन्स वाढला आहे. कुस्तीपटू सागर राणाच्या हत्येचा आरोप (Sagar Rana Murder Case) त्याच्यावर करण्यात आला असून त्याच्याविरोधान अजामीनपात्र अटर वॉरंट देखील जारी करण्यात आलं आहे. ANI वृत्तसंस्थेनं अशी माहिती दिली आहे की, सुशील कुमारला अद्याप अटक करण्यात आली नाही आहे. दिल्ली पोलिसातील ज्येष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान 23 वर्षीय कुस्तीपटू सागर राणा याच्या हत्येप्रकरणी सुशील कुमार याच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
"Wrestler Sushil Kumar has not been arrested yet. A team of Delhi Police is present in Punjab," says a Senior Official of Delhi Police
A non-bailable warrant was issued against Sushil Kumar & others in case relating to the killing of 23-year-old Sagar Rana at Chhatrasal Stadium — ANI (@ANI) May 23, 2021
नेमकं काय घडलं?
काही दिवसांपूर्वी दिल्लीतील छात्रसाल स्टेडियममध्ये 23 वर्षीय पैलवान सागर राणा याची हत्या झाल्याची घटना घडली होती. या हत्येतील प्रमुख आरोपी म्हणून ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार याचं नाव समोर आलं होतं. पोलिसांनी तपास सुरू करताच सुशील कुमार फरार झाला आहे. मागील काही दिवसांपासून दिल्ली पोलीस सुशील कुमारचा शोध घेत आहे. शिवाय सुशील कुमारची माहिती देणाऱ्यांना बक्षिसही जाहीर करण्यात आलं आहे.
सुशील कुमार विरोधात महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांच्या हाती लागलं होतं, त्यामुळे त्याच्या विरोधात सबळ पुरावा देखील मिळाला होता. फॉरेन्सिक सायन्स लॅबनं आपल्या अहवालात मोबाईलमधील व्हिडीओ फुटेज योग्य असल्याचं सांगितलं आहे. या व्हिडीओमध्ये सुशीलकुमार आपल्या साथीदारांसह 23 वर्षीय पैलवान सागर राणाला बेदम मारहाण करताना दिसत आहे. छत्रसाल स्टेडियमच्या CCTV फुटेजमध्येही सुशील कुमार आपल्या 20 ते 25 साथीदारांसह सागर धनखड आणि अन्य दोघांना मारहाण करताना दिसत आहे. संबंधित CCTV फुटेजमध्ये सुशील कुमार, सागर आणि अन्य दोघांना हॉकी स्टिकनं मारहाण करत आहे. हा व्हिडीओ खरा असल्याचं फॉरेन्सिक सायन्स लॅबनं आपल्या अहवालात म्हटलं आहे.
हे वाचा-एकाच कुटुंबातील 5 जणांची निर्घृण हत्या, मृतांमध्ये 10 वर्षाखालील तिघांचा समावेश
कुस्तीपटू सुशील कुमारनं अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. पण न्यायालयानंही त्याला दिलासा दिला नाही. सागर राणा हत्या प्रकरणात संशयित आरोपींची चौकशी आवश्यक असल्याचं न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलं होतं. यानंतर आता फरार आरोपी सुशील कुमार मेरठ येथील एका टोल नाक्यावर सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला होता.
तेव्हापासून पोलिसांनी फरार आरोपी सुशील कुमारची माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षिसाची घोषणा केली आहे. तर सुशील कुमारचा प्रमुख साथीदार आणि फरार आरोपी अजय याची माहिती देणाऱ्यास 50 हजार रुपयांच्या बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे. सुशील कुमार आपल्या साथीदारांसोबत तयारीनिशी येऊन लोखंडी रॉड आणि हॉकी स्टीकनं मारहाण केली आहे. मृत सागर राणाच्या अंगावर 50 हून अधिक जखमा झाल्याचं वैद्यकीय तपासणीत समोर आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Murder