पैलवान सागर राणा हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटू सुशील कुमार आणि इतर आरोपी विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. तर दुसरीकडे कुस्तीपटू सुशील कुमारनं अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. पण न्यायालयानंही त्याला दिलासा दिला नाही. सागर राणा हत्या प्रकरणात संशयित आरोपींची चौकशी आवश्यक असल्याचं न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलं होतं. यानंतर आता फरार आरोपी सुशील कुमार मेरठ येथील एका टोल नाक्यावर सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला आहे. हे वाचा- धक्कादायक! ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारवर खुनाचा आरोप,पोलिसांकडून शोध सुरू तेव्हापासून पोलिसांनी फरार आरोपी सुशील कुमारची माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षिसाची घोषणा केली आहे. तर सुशील कुमारचा प्रमुख साथीदार आणि फरार आरोपी अजय याची माहिती देणाऱ्यास 50 हजार रुपयांच्या बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे. सुशील कुमार आपल्या साथीदारांसोबत तयारीनिशी येऊन लोखंडी रॉड आणि हॉकी स्टीकनं मारहाण केली आहे. मृत सागर राणाच्या अंगावर 50 हून अधिक जखमा झाल्याचं वैद्यकीय तपासणीत समोर आलं आहे.Sushil Kumar was seen at Meerut toll plaza: Delhi Police
Read @ANI Story | https://t.co/yOUydnODuI pic.twitter.com/PhtasLESaV — ANI Digital (@ani_digital) May 20, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder