जयपूर, 23 मे : राजस्थानमधील (Rajasthan) भरतपुर (Bharatpur) जिल्ह्याच्या लखनपुर भावात एका भावाने आपल्या बहिणीला खोलीत बंद करून टाळं लावलं. बराच काळ बहीण उपाशीपोटी खोलीत तडफडत होती. मात्र तरीही भावाचं हृदय पिळवटलं नाही. शेवटी तडफडतच बहिणीचा मृत्यू झाला.
गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. शेवटी पोलिसांनी तब्बल दीड वर्षांनंतर आरोपीला अटक केली आहे. तो उत्तरप्रदेशातील अरदाया भागातील राहणारा आहे. त्याचं नाव श्याम सुंदर आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावित्रीचा मोठा भाऊ विजयपाल यांनी गेल्या वर्षी 25 जानेवारी रोजी लखनपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. ज्यात त्यांनी गावात राहणारी बहिण सावित्रीची तिच्या शेजारच्यांनी हत्या केल्याची तक्रार दाखल केली होती. आणि यावर कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणात पोलिसांनी तपास केल्यानंतर समोर आलं की, सावित्रीचा पती रमेश आणि त्याचा मोठा भाऊ विरेंद्र यांचं शेजारच्यांसोबत भांडण झालं होतं. यात शेजारच्या देशराजच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी रमेश आणि विरेंद्र विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर दोघांना अटक करण्यात आली होती.
सावित्री मनोरुग्ण होती. ज्यामुळे पती, दीर तुरुंगात गेल्यानंतर स्वत:चा सांभाळ करणं तिला शक्य होत नव्हतं. यामुळे हायकोर्टाने सावित्रीचा छोटा भाऊ आणि मोठा भाऊ विजयपालला तिची काळजी घेण्याचे आदेश दिले होते. कोर्टाच्या आदेशानंतरही भाऊ आणि विजयपाल सावित्रीची काळजी घेत नव्हते. तिला वेळेवर जेवण दिलं जात नव्हतं. एकेदिवशी तिचा भाऊ सावित्रीला खोलीत बंद करून टाळं लावून निघून गेला. ज्यानंतर उपासमार झाल्याने सावित्रीचा 24 जानेवारी 2021 रोजी मृत्यू झाला. यादरम्यान तिचा भाऊ आणि विजयपाल सावित्रीच्या हत्येमागे जबाबदार असल्याचं समोर आलं.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.