कोची, 17 एप्रिल: केरळमधील पलक्कड (Palakkad, Kerala) येथे शनिवारी एका RSS कार्यकर्त्याची (RSS activist) हत्या करण्यात आली. हल्लेखोर दुचाकीवरून आले होते आणि त्यांनी धारदार शस्त्राने 20 वार केले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस विभागाला सतर्क करण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे 24 तासांपूर्वी केरळमध्ये पीएफआयच्या एका नेत्याचीही हत्या करण्यात आली.
वृत्तसंस्थेने केरळ पोलिसांच्या हवाल्यानं म्हटलं आहे की, पलक्कडमध्ये आज एका RSS कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. आरएसएसचे माजी शारीरिक शिक्षण प्रमुख श्रीनिवासन असे मृत कार्यकर्त्याचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यक्षदर्शींनी हल्लेखोरांची संख्या पाच सांगितली, ते दुचाकीवरून श्रीनिवासन यांच्या दुकानात आले होते. श्रीनिवासन यांना काही समजण्यापूर्वीच हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी 20 वार केले. त्यामुळे श्रीनिवासन यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलीस विभागाला परिसरात सतर्क करण्यात आले आहे. आरोपींचा शोध सुरू आहे.
हनुमान जयंतीदिनी राजधानीत 50 मिनिटं राडा; दगडफेक, जाळपोळीनंतर 6 संशयित ताब्यात
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, जखमी कार्यकर्त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याला वाचवता आलं नाही. श्रीनिवासन यांच्या हत्येमागील वादग्रस्त संघटना पीएफआयशी संलग्न असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
श्रीनिवासन यांच्यावरील हल्ल्याच्या 24 तास आधी येथील जवळच्या गावात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (पीएफआय) नेता सुबैर यांच्या हत्येचा प्रकार उघडकीस आला होता. शुक्रवारी मशिदीत नमाज अदा करून घरी परतत असताना सुबैरची हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे. प्राथमिक तपासात पोलीस या घटनेला श्रीनिवासन यांच्या हत्येचा दुवा मानत आहेत.
RSS कार्यकर्त्याच्या हत्येनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी ट्विट करून केरळ सरकार आणि कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या कारकिर्दीत संस्थेने 23 कार्यकर्ते गमावल्याचे त्यांनी ट्विट केलंय. केरळमध्ये डावे आणि जिहादींची दहशत झपाट्याने वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.