पोलीस असल्याचा बनाव रचत बायकोच्या मित्राकडून लाटले 5 लाख रुपये, प्रेमसंबंधाचा आरोप करत उकळले पैसे

पोलीस असल्याचा बनाव रचत बायकोच्या मित्राकडून लाटले 5 लाख रुपये, प्रेमसंबंधाचा आरोप करत उकळले पैसे

Crime in Mumbai: भिवंडी येथील रहिवासी असणाऱ्या एका युवकानं पोलीस असल्याचा बनाव रचत आपल्या बायकोच्या मित्राकडून 5 लाख रुपये लाटले आहेत.

  • Share this:

मुंबई, 15 मे: भिवंडी येथील रहिवासी असणाऱ्या एका युवकानं पोलीस असल्याचा बनाव रचत आपल्या बायकोच्या मित्राकडून 5 लाख रुपये लाटले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी युवकाला बेड्या (Accused arrest) ठोकल्या असून त्याच्याविरोधात ब्लॅकमेल (Blackmail Case) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी व्यक्तीनं आपल्या गुन्हा कबुल केला आहे. याप्रकरणात आरोपी व्यक्तीच्या बायकोचा सहभाग आहे का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

संबंधित आरोपी युवकाचं नाव तुषार शिलवंत असून त्याची बायको एक ब्युटीशिअन आहे. पण सध्या दोघं विभक्त राहत आहेत. आरोपी शिलवंत याची बायको ज्या ब्युटी पार्लरमध्ये कामाला आहे, त्याठिकाणी फिर्यादी अधून मधून मसाज करण्यास येत असायचा. त्यामुळे आपल्या बायकोचे फिर्यादीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपीला होता. यातूनच त्यानं पोलीस असल्याचा बनाव रचत फिर्यादीकडून 5 लाख रुपये उकळले आहेत. तसेच पैसे न दिल्यास अनैतिक संबंध ठेवल्यामुळे मोठी कारवाई करण्याची धमकीही आरोपीनं दिली होती.

मीड डेनं दिलेल्या वृत्तानुसार, 7 एप्रिल रोजी फिर्यादीला एक अज्ञात कॉल आला. यावेळी आरोपी शिलवंतनं आपण वाशी येथील गुन्हे शाखेचा पोलीस अधिकारी असल्याचा बनाव रचला. तसेच ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या महिलेशी तुझे प्रेमसंबंध आहेत. त्यामुळे कारवाई टाळायची असले तर 10 लाख रुपये दे, अशी धमकी आरोपीनं फिर्यादीला दिली. यानंतर कारवाईच्या भीतीनं फिर्यादीनं चार दिवसांत 5 लाख रुपये आरोपीला दिले. पण आरोपीचं एवढ्यावर पोट भरलं नाही. त्यानं 1 मे रोजी पुन्हा फोन करून आणखी 5 लाख रुपयांची मागणी केली. हे प्रकरण कायमचं मिटवायचं असेल तर आणखी 5 लाख रुपये दे, अशी धमकी आरोपीनं केली.

हे ही वाचा-हत्या करून पेटीत भरला होता 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह, हत्येचं कारण आलं समोर!

घाबरलेल्या फिर्यादीनं कर्ज काढून आरोपीला पैसे देण्याची तयारी दाखवली पण आरोपींनी त्याला त्रास देणं सुरूचं ठेवलं. त्यामुळे आरोपींच्या त्रासाला कंटाळून फिर्यादीनं या घटनेची माहिती मनपाडा पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपी युवकाला गजाआड केलं आहे. याप्रकरणात आरोपी युवकाच्या बायकोची काय भूमिका आहे, याबाबतची चौकशी केली जात आहे.

Published by: News18 Desk
First published: May 16, 2021, 1:38 PM IST

ताज्या बातम्या