Home /News /crime /

अबब! मुंबईत एक्सप्रेस ट्रेनमध्ये सापडलं 2 कोटींचं ड्रग्ज, ‘या’ टोळीचे कारनामे उघड

अबब! मुंबईत एक्सप्रेस ट्रेनमध्ये सापडलं 2 कोटींचं ड्रग्ज, ‘या’ टोळीचे कारनामे उघड

ड्रग्ज येत असल्याची गुप्त सूचना पोलिसांना मिळाली होती. त्या सूचनेवरून पोलिसांनी सापळा रचला आणि एर्नाकुलम् मंगला एक्सप्रेसमधून Amphetamines हे ड्रग्ज जप्त केलं.

    दिवाकर सिंग, मुंबई 8 जुलै: मुंबईत रेल्वे पोलिसांना (Mumbai Railway Police) मोठं यश मिळालं आहे. एर्नाकुलम् मंगला एक्सप्रेसमधून पोलिसांनी तब्बल 2 कोटींचं ड्रग्ज् (Drugs) जप्त केलं आहे. कोरोनाच्या (Corona lockdown) काळात कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही ड्रग्ज तस्करांचे कारनामे सुरूच असल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका नायजेरियन नागरिकाला अटक केली आहे. मुंबईत कुख्यात असलेली याच लोकांच्या टोळीचा तो प्रताप असल्याची माहिती आता पुढे येत आहे. कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाऊनमध्ये दोन महिने सगळे व्यवहार बंद होते. वाहतुकही बंद होती.  त्या काळात गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसला होता. आता सर्व व्यवहार पूर्वपदावर आणण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. एका ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज येत असल्याची गुप्त सूचना पोलिसांना मिळाली होती. त्या सूचनेवरून पोलिसांनी सापळा रचला आणि एर्नाकुलम् मंगला एक्सप्रेसमधून Amphetamines हे ड्रग्ज जप्त केलं. AC- 3 TIER  कोचमध्ये प्रवास करणाऱ्या एका नायजेरीयन प्रवाशाच्या सामानात हे ड्रग्ज सापडलं. अतिशय हुशारीने ओळखू येणार नाही अशा पद्धतीने त्याने ड्रग्जची पाकिटं लपवून ठेवली होती. मात्र पोलिसांच्या तपासात त्याचे बिंग अखेर फुटले. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 2 कोटींपेक्षा जास्त असल्याची माहितीही दिली जात आहे. हे वाचा - या काळ्या कामांसाठीही COVID-19 स्‍पेशल ट्रेनचा वापर, बॉक्स पाहून बसला धक्का गेल्या अने वर्षांपासून मुंबईत राहणारे नायजेरीयन माणसं यात गुंतल्याचं वारंवार उघड झालं आहे. त्यांची एक मोठी टोळी असून स्थानिक लोकांच्या मदतीने हे गुन्हेगार मुंबई आणि सर्व देशातच ड्रग्जचा पुरवढा करत असतात. हे वाचा - BSIVवाहनांबद्दल कोर्टाचा निकाल,31मार्चनंतरच्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन रद्द अनेक गुन्हेगारांना अटक करूनही ही टोळी उद्धवस्त करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. मुंबईतल्या मिरारोड, वसई यासारख्या काही भागांमध्ये या लोकांची मोठी संख्या आहे. स्थानिकांशी दांडगाई करून पैशांच्या जोरावर इथे ठाण मांडलं असून अशा प्रकारच्या अनेक गुन्ह्यांमध्ये ही माणसं सहभागी असल्याची माहिती पुढे आली आहे.

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या