Home /News /crime /

24 वर्षांपासून बंद होती रुग्णालयाची लिफ्ट; दरवाजा उघडताच आतलं दृश्य पाहून उडाला सगळ्यांचा थरकाप

24 वर्षांपासून बंद होती रुग्णालयाची लिफ्ट; दरवाजा उघडताच आतलं दृश्य पाहून उडाला सगळ्यांचा थरकाप

एका रुग्णालयातील लिफ्ट मागील 24 वर्षांपासून बंद होती. 24 वर्षांनंतर जेव्हा हा दरवाजा रिपेअर करून उघडण्यात आला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.

    नवी दिल्ली 12 सप्टेंबर : जगभरातून अशी अनेक प्रकरणं समोर येतात ज्यात वर्षानुवर्षे बंद असलेल्या घराच्या आतून अजब गोष्टी मिळतात. काही प्रकरणांमध्ये घरात अनेक वर्षांपासून पडून असलेले सडलेले मृतदेह आढळल्याचंही समोर आलं आहे. सध्या असंच एक प्रकरण उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh) समोर आलं आहे. येथील बस्ती जिल्ह्यातील एका रुग्णालयातील लिफ्ट मागील 24 वर्षांपासून बंद होती. 24 वर्षांनंतर जेव्हा हा दरवाजा रिपेअर करून उघडण्यात आला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. लिफ्टमध्ये अनेक वर्षांपासून एका व्यक्तीचा मृतदेह (Rotten Dead Body In Lift) होता. सतर्क राहा!, साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांच्या पोलिसांना सूचना ही घटना 1 सप्टेंबरला उघड झाल्याचं म्हटलं जात आहे. इथे OPEC रुग्णालयातील एक लिफ्ट मागील चोवीस वर्षापासून बंद होती. 1 सप्टेंबरला इंजिनिअर्सनं अखेर ही लिफ्ट ठीक करून खोलली. मात्र, लिफ्टचा दरवाजा उघडताच सर्वांनाच धक्का बसला. दरवाजाच्या मागे एक मानवी सांगाडा पडलेला होता. हा मृतदेह नेमका कोणाचा आहे. याची अद्याप माहिती मिळालेली नाही. याचा DNA तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. अनेक वर्षांनी लिफ्टचा दरवाजा उघडताच सगळेच हैराण झाले. आतमध्ये एक सांगाडा उभा होता. लोक हे पाहून हैराण झाले की इतक्या वर्षांपासून मृतदेह याच ठिकाणी उभा होता. मात्र कोणाला खबरही लागली नाही. पोलीस सध्या आसपासच्या सर्व स्टेशनमध्ये तपास करत आहेत, की या काळात कोण बेपत्ता झालं होतं. मांत्रिकाच्या मदतीनं पतीला ब्लॅकमेल करत मागितले 1कोटी; कोथरूडमधील महिलेचा प्रताप मिळालेल्या माहितीनुसार, हे रुग्णालय 1991 मध्ये सुरू झालं होतं. यातील लिफ्टचा वापर 1997 पर्यंत झाला होता. यानंतर लिफ्ट खराब झाल्यानं ती बंद होती. रुग्णालय प्रशासनानंही कधी ही लिफ्ट दुरुस्त करून घेतली नाही. आता 24 वर्षांनंतर लिफ्ट दुरुस्त करून दरवाजा खोलला असता आतमध्ये सांगाडा आढळला. हा मृतदेह नेमका कोणाचा होता हे कोणालाही माहिती नाही.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Viral news

    पुढील बातम्या