Home /News /crime /

प्रख्यात शिल्पकाराच्या आर्ट स्टुडिओवर दरोडा, वॉचमनला मारहाण, पत्नीला जीवे मारण्याची धमकी

प्रख्यात शिल्पकाराच्या आर्ट स्टुडिओवर दरोडा, वॉचमनला मारहाण, पत्नीला जीवे मारण्याची धमकी

नाशिकच्या सातपूर नजिकच्या बेळगाव ढगा येथे शिल्पकार गर्गे यांचा आर्ट स्टुडिओ आहे. देश-विदेशातील नामवंत शिल्प येथे घडवले जातात. याच आर्ट स्टुडिओत मोठा दरोडा पडल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिक, 11 डिसेंबर : नाशिकमध्ये (Nashik) प्रख्यात शिल्पकार मदन गर्गे (Madan Garge) यांच्या सातपूर नजिकच्या बेळगाव ढगा येथील आर्ट स्टुडिओवर (Art Studio) संशयितांनी दरोडा टाकला. चोरांनी वॉचमन आणि त्याच्या पत्नीस कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत साडेआठ लाख रुपयांचे महापुरुषांच्या पुतळ्याचे ब्राँझ धातूचे भाग जबरीने चोरुन (Stolen) नेले. स्टुडिओवर पाळत ठेवून तसेच किंमती ब्राँझ धातूच्या चोरीसाठीच दरोड्याचा हा धाडसी प्रकार झाल्याचा अंदाज सातपूर पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे.

नेमकं काय घडलं?

नाशिकच्या सातपूर नजिकच्या बेळगाव ढगा येथे शिल्पकार गर्गे यांचा आर्ट स्टुडिओ आहे. देश-विदेशातील नामवंत शिल्प येथे घडवले जातात. वॉचमन जयदेव किसन जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी (6 डिसेंबर) पहाटे आठ ते दहा अनोळखी संशयितांनी कारखान्यात प्रवेश केला. जयदेव यास कोयत्याच्या उलट्या बाजूने मारहाण करण्यात आली. तर त्याची पत्नी शैलाबाईला मारुन टाकण्याची धमकी देत दहशत निर्माण करण्यात आली. हेही वाचा : 25 वर्षांची नोकरी, 30 लाखांच्या साड्या; विश्वासघाताची ही कहाणी ऐकून बसेल धक्का

दरोडेखोरांनी 1400 किलो 'ब्राँज' पळवलं

कारखान्यात असलेल्या संत तुकाराम महाराज यांच्या पुतळ्याचे कमरेखालील प्रत्येकी 350 किलो वजनाचे आणि 4 लाख 20 हजार रुपये किंमतीचे ब्राँझचे दोन भाग, 150 किलो वजनाची आणि 90 हजार रुपये किंमतीचा विणा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा कमरेखालील 450 किलो वजनाचा आणि 2 लाख 70 हजार रुपये किंमतीचा भाग, तसेच 100 किलो वजनाची व 60 हजार रुपये किंमतीची तलवार असा एकूण 1400 किलो वजनाचे ब्राँझ पळवण्यात आले. या सर्व ब्राँजची किंमत ही 8 लाख 40 हजार रुपये इतकी आहे. हेही वाचा : गर्लफ्रेंडने उचलला नाही फोन, नाराज प्रियकराने मध्यरात्री केलं धक्कादायक कृत्य महाराष्ट्रात सशस्त्र दरोड्याच्या घटनांमध्ये वाढ महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सशस्त्र दरोड्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी बीडमध्ये काही चोरट्यांनी दोन ठिकाणी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना समोर आली होती. त्यांनी तिसऱ्या ठिकाणी देखील दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. पण नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांनी धूम ठोकली होती. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी घरांवर दरोडा टाकण्याच्याच घटना नाहीत तर भर दिवसा सशस्त्र दरोडा टाकल्याच्या घटना समोर आल्या आहेत. गेल्या दोन महिन्यात महाराष्ट्रातील विविध भागात जवळपास तीन ते चार ठिकाणी बँक किंवा पतपेढ्यांवर सशस्त्र दरोडा टाकल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. या दरोड्यांमध्ये जिवीतहानी देखील झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चोरांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही हे स्पष्टपणे जाणवताना दिसत आहे.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या