रायपूर, 12 ऑगस्ट : एका गोल्ड लोन कार्यालयात (Gold loan office) दरोडा (Robbery) घालून सोनं लुटण्याच्या प्रयत्न करणाऱ्या दोघांपैकी एकाला पोलिसांनी अटक (arrest) केली असून दुसरा पळून गेला (ran away) आहे. दरोड्यादरम्यान एका कर्मचाऱ्याने हुशारी दाखवत अलार्म (alarm) वाजवला. या अलार्मची सूचना मुख्य कार्यालयात गेली. तिथून पोलिसांना संपर्क साधण्यात आला आणि पोलिसांनी दरोडेखोराला अटक केली.
असा पडला दरोडा
छत्तीसगडमधील दुर्गमध्ये मणप्पुरम गोल्ड लोनच्या कार्यालयात दोन व्यक्ती एका कारमधून आल्या. ऑफिसच्या बाहेर कार पार्क करून दोघे आत आले. त्यतील एकाने आत येताच खिशातून पिस्तुल काढलं आणि सर्वांना धमकवायला सुरुवात केली. त्याच्यासोबत असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीनं सर्व कर्मचाऱ्यांना शांत उभं राहायला सांगून ऑफिसमधील सर्व सोनं आणि रोख रक्कम एक बॅगेत भरायला सांगितली. या दरम्यान, कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने तिथे लावलेला अलार्म वाजवला.
अलार्मने केले काम
हा अलार्म कंपनीच्या केरळमधील मुख्य कार्यालयात वाजला. त्यावरून मणप्पुरम शाखेत काहीतरी गडबड असल्याचा संकेत मुख्य शाखेला मिळाला. त्यांनी दुर्गच्या एसपींना फोन करून याची कल्पना दिली. त्याचप्रमाणं या अलार्मची सूचनाही पोलीस स्टेशनला मिळाली. पोलीस स्टेशन या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरच असल्यामुळे तातडीने पोलीस त्या ठिकाणी आले. बाहेर काहीतरी गडबड सुरु असल्याची जाणीव दरोडेखोरांना झाल्यानंतर त्यांनी हाती लागलेलं थोडंथोडकं सोनं घेऊन पोबारा करण्याचा प्रयत्न केला, अशी बातमी 'दैनिक भास्कर'नं दिली आहे.
हे वाचा -इमाम साहेबांना महागात पडतेय Social Media वरील मैत्री
एकाला अटक
पळून जाणाऱ्या एका दरोडेखोराला कर्मचाऱ्यांच्या मदतीनं पोलिसांनी अटक केली, तर दुसरा पळून जाण्यात यशस्वी ठरला. अटक केलेल्या दरोडेखोराचं नाव विनय बाफना असून त्याचं वय साधारण 55 वर्षे असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकऱणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chattisgarh, Crime, Gold robbery, Robbery