जालना, 19 नोव्हेंबर : जालना (jalana) जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे शिवसेनेच्या (Shivsena) उपतालुका प्रमुखांच्या घरी दरोडा (robbery) टाकून चोरट्यांनी तब्बल 21 लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.
औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील वडीगोदरी शिवारात ही घटना घडली आहे. शिवसेनेचे तालुका प्रमुख श्रीराम खटके यांच्या घरातील सदस्य नेहमीप्रमाणे घराच्या घराबाहेर झोपलेले होते. बुधवारी रात्री 5 दरोडेखोरांनी धारदार शस्त्रांच्या मदतीने खडके यांच्या घरावर दरोडा टाकला. घराबाहेर झोपलेल्या सदस्यांना बेदम मारहाण केली.
भाजप सरकारच्या 5 वर्षांच्या काळात तब्बल 36 हजार 992 कोटींची वीज बिल थकबाकी
घराबाहेर झोपलेल्या आजीला चाकूचा धाक दाखवत घरातून तब्बल 19 तोळे सोनं आणि रोख रक्कमेसह सुमारे 21 लाखांचा माल लंपास केला. दरोडेखोरांनी मुद्देमाल घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. श्रीराम खटके यांचे जावई हे पोलीस दलात आहे.
घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले. तसंच जालना शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.
विरारमध्ये 4 कोटींच्या रोकडसह एटीएम व्हॅन पळवून नेणारे अटकेत
दरम्यान, दिवाळीच्या (Diwali) पूर्वसंध्येला अर्नाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका एटीममध्ये रोकड भरण्यासाठी आलेल्या व्हॅनचा चालक एटीएम व्हॅन घेवून पळाल्याची घटना समोर आली होती. तब्बल आठ दिवसांनी या प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 4 कोटी 28 लाख, 70 हजार 100 रुपये हस्तगत केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायटर बिझनेस कंपनी ठाणे यांची गाडी गुरवारी सायंकाळी 5 च्या सुमारास विरार पश्चिम बोळींज येथे असलेल्या महिंद्रा कोटक बँकेच्या एटीएममध्ये रोकड भरण्यासाठी होती. यात दोन सुरक्षारक्षक आणि मदतनीस होता. यावेळी एटीएम सेंटरजवळ व्हॅन उभी असताना चालक रोहित बबन आरु हा सुरक्षारक्षक आणि मदतनीस एटीएम मशीन उघडण्यास व्यस्त असताना व्हॅन घेऊन पसार झाला होता.
भाजप नेत्यानं मनापासून केलं राज ठाकरेंचं अभिनंदन; म्हणाले आम्हीही तुमच्यासोबत
आरोपी चालक रोहित हा चेंबूर येथे राहणारा असून तो 3 महिन्यांपूर्वीच अक्षरा टूर अॅण्ड ट्रॅव्हल्स या कंपनीत कामाला लागला होता. त्याने पळवून नेलेली एटीएमची व्हॅन पोलिसांनी कल्याण फाट्यावर जप्त केली होती. त्यात 2 कोटी 33 लाख रुपये आढळले होते. पुढील तपासात पोलिसांना यात नवी मुंबई येथील अक्षय प्रभाकर मोहिते (वय 24) हा सुद्धा सामील असल्याची माहिती मिळाली.