मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /ग्राहक बनून आले आणि लाखो रुपयांचे दागिने घेऊन पसार झाले, LIVE VIDEO

ग्राहक बनून आले आणि लाखो रुपयांचे दागिने घेऊन पसार झाले, LIVE VIDEO

गुरुवारी दुपारी काही तरुण हे ग्राहक बनून ज्वेलरी शॉपमध्ये घुसले होते. दागिने खरेदी करण्याचे नाटक केल्यानंतर...

गुरुवारी दुपारी काही तरुण हे ग्राहक बनून ज्वेलरी शॉपमध्ये घुसले होते. दागिने खरेदी करण्याचे नाटक केल्यानंतर...

गुरुवारी दुपारी काही तरुण हे ग्राहक बनून ज्वेलरी शॉपमध्ये घुसले होते. दागिने खरेदी करण्याचे नाटक केल्यानंतर...

मीरा रोड, 08 जानेवारी : मुंबई जवळील मीरा रोड (Meera Raod) भागात धाडसी दरोड्याची घटना समोर आली आहे. भरदिवसा दरोडेखोरांनी कुमार गोल्ड अँण्ड डायमंडस ज्वेलरी शॉप (S Kumar Gold and Diamond Jewellery Shop) बंदुकीचा धाक दाखवून लाखो रुपयांची दागिने लंपास करून पसारा झाले.

मीरा रोडच्या शांतीनगर सेक्टर 4 मध्ये असलेल्या एस. कुमार गोल्ड अँण्ड डायमंडस ज्वेलरी शॉपमध्ये ही घटना घडली. गुरुवारी दुपारी काही तरुण हे ग्राहक बनून ज्वेलरी शॉपमध्ये घुसले होते. दागिने खरेदी करण्याचे नाटक केल्यानंतर त्यांनी बंदुका बाहेर काढल्या आणि सर्व कर्मचाऱ्यांना वेठीस धरले. घडलेल्या या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोटारसायकलवरून  दरोडेखोर ग्राहक बनून आले व  दुकानात दाखल झाले होते. बंदुकीचा धाक दाखवून त्यांनी दागिने, अंगठा, सोने बॅगेत भरून  पसार झाले.  एका मोटर सायकलवर दोन आरोपी पसार झाले.

तर ज्या मोटारसायकलवर हे चोर आले होते, त्यावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण लोकांची गर्दी झाली होती. लोकांनी दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून घटनास्थळावरच मोटारसायकल सोडून पळ काढला.  मोटरसायकल जागेवर सोडून पायी धावत स्टेशनच्या दिशेने पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्वेलरी शॉपचा पंचनामा केला. दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी वेगळे पथक तयार केले आहे. या  घटनेची अधिक  तपास पोलीस करत आहे. परंतु, भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात आणि दुकानदारांमध्ये दहशत पसरली आहे.

First published: