मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /धक्कादायक! पुण्यात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणासोबत घडला विचित्र प्रकार

धक्कादायक! पुण्यात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणासोबत घडला विचित्र प्रकार

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

ड्रायव्हरने इंजिनिअरला 100 रुपये तिकीटाचे पैसे घेईन, असं सांगितलं. परंतु, इंजिनिअरने 60 रुपये देणार, असं म्हटलं. ड्रायव्हरने होकार दिला आणि त्याला गाडीत बसण्यास सांगितलं.

    पुणे 31 मे : पुण्यातील (Pune) हिंजवडीमध्ये एका 32 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरला (Engineer) लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटल्याची घटना घडली आहे. कारचा चालक आणि त्याच्या मित्राने या इंजिनिअरला जीवे मारण्याची धमकी देत त्याचा 3 हजार रुपये किमतीचा फोन (Phone) लुटला. त्यानंतर त्याला मुंबई-पुणे हायवेवर तळेगाव दाभाडेजवळ गाडीतून उतरवून दिलं. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास सुरू आहे.

    सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण हा हिंजवडी येथील एका आयटी कंपनीत क्वालिटी इंजिनिअर (Quality Engineer) म्हणून काम करत असून, तो दररोज खोपोलीहून पुण्याला जाणं-येणं करतो. 27 मे रोजी संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास तो भूमकर चौकात पोहोचला. तिथे तो घरी जाण्यासाठी काही वाहन मिळतं का, याची वाट बघत होता. तितक्यात एक पांढरी SUV कार त्याच्याजवळ येऊन थांबली. त्या गाडीत दोन माणसं होती.

    लग्नानंतर नवरीचा हात पकडून नवरदेवाचं धक्कादायक कृत्य; थेट पोलिसांत पोहोचलं प्रकरण

    ड्रायव्हरने इंजिनिअरला कुठे जायचंय, असं विचारलं. तेव्हा त्याने ड्रायव्हरला खोपोलीला जायचंय असं सांगितलं. तर, आपणही तिथेच जातोय, चला तुम्हाला सोडतो, असं म्हणत ड्रायव्हरने इंजिनिअर तरुणाला कारमध्ये बसण्यास सांगितलं. या संदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिलंय.

    त्यानंतर ड्रायव्हरने इंजिनिअरला 100 रुपये तिकीटाचे पैसे घेईन, असं सांगितलं. परंतु, इंजिनिअरने 60 रुपये देणार, असं म्हटलं. ड्रायव्हरने होकार दिला आणि त्याला गाडीत बसण्यास सांगितलं. थोडं पुढे गेल्यावर ड्रायव्हरच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीने एक फोन करायचाय, असं म्हणत इंजिनिअर तरुणाचा फोन मागितला. फोन केल्यावर त्याने तरुणाला तुझ्याजवळ किती पैसे आहेत, अशी विचारणा केली. यावर आपल्याजवळ 100 रुपयेही नाहीत, असं तरुणाने सांगितलं. त्यानंतर त्या व्यक्तीने इंजिनिअरच्या फोनमधून सिमकार्ड (SIM Card) काढून त्याला परत दिलं. तोपर्यंत गाडी तळेगाव दाभाडेला पोहोचली होती.

    पतीच्या मैत्रिणीवर बलात्कार करण्यासाठी भाड्याने आणले 5 लोक; मग शूट केला व्हिडिओ अन्.., महिलेचा कट जाणून हादराल

    त्या व्यक्तीने इंजिनिअरला आपण चोर असल्याचं म्हणत फोन परत देणार नाही, असं सांगितलं. त्यांनी इंजिनीअरला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिथंच उतरायला सांगितलं. चोरट्यांनी त्याला तळेगाव दाभाडेजवळ मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सोडून दिलं आणि मुंबईच्या दिशेने निघून गेले, अशी माहिती पोलीस अधिकारी सागर काटे यांनी दिली.

    त्यानंतर हा इंजिनिअर कसाबसा घरी पोहोचला आणि रविवारी त्याने शिरगाव पोलिसांत तक्रार दाखल केली. पुढील तपासासाठी हे प्रकरण हिंजवडी पोलिसांना सोपवण्यात आलंय. दरम्यान, या प्रकरणातील दोन चोरट्यांचा आणि एसयूव्हीचा शोध सुरू केला आहे, असं पोलीस अधिकारी सागर काटे यांनी सांगितलं.

    First published:

    Tags: Crime news, Theft