Home /News /crime /

धक्कादायक: मंदिरातच 3 पुजाऱ्यांची हत्या, दरोडेखोरांनी दानपेट्यांवरही मारला डल्ला

धक्कादायक: मंदिरातच 3 पुजाऱ्यांची हत्या, दरोडेखोरांनी दानपेट्यांवरही मारला डल्ला

सकाळी जेव्हा स्थानिक लोकांना मंदिराची दारं उघडी दिसली तेव्हा त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिलं. त्यानंतर सगळ्यांना धक्काच बसला.

     बंगळुरू11 सप्टेंबर: कर्नाटकमधल्या मंड्यामध्ये एका मंदिरातल्या 3 पुजाऱ्यांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. इथल्या अराकेश्वर मंदिरात ही घटना घडली. गुरूवारी पहाटे मंदिरात दरोडेखोरांनी प्रवेश केला आणि झोपलेल्या पुजाऱ्यांची हत्या केली. त्यानंतर त्यांनी मंदिरातल्या दानपेट्याही पळवून नेल्या आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी तीन पथकं स्थापन केली आहेत. हे मंदिर इथलं प्रसिद्ध मंदिर आहे. कोरोनामुळे पुजारी हे मंदिरातच झोपत होते. या मंदिराचा कारभार हा सरकारकडे आहे. पहाटे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान दरोडेखोर आले होते. 3 पेक्षा त्यांची संख्या जास्त असावी. त्यांनी झोपलेल्या पुजाऱ्यांवर शस्त्रांनी वार करून हत्या केली अशी माहीती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर त्यांनी मंदिरातल्या तीन मोठ्या दानपेट्या पळवून नेल्या. मंदिराबाहेर त्या फोडून त्यातले पैसे लंपास केले अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. सकाळी जेव्हा स्थानिक लोकांना मंदिराची दारं उघडी दिसली तेव्हा त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिलं. मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून तरुणीने मारली उडी; काळजाचा ठोका चुकवणारा LIVE VIDEO त्यानंतर सगळ्यांना धक्काच बसला. तीन पुजारी मृतावस्थेत आढळून आलेत. मंदिराच्या गर्भगृहातही दरोडेखोरांनी तोडफोड केली होती. दानपेट्या पळविण्यासाठी त्यांनी तोडफोड केली असावी असंही पोलिसांनी सांगितलं. मंदिरच्या सुरक्षेविषयी आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी नागरीकांनी केली आहे. 'कोरोना व्हायरसचा नाश झाला', देशात COVID-19 चा प्रकोप होत असताना भाजप नेता बरळला पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवावी आणि विश्वास निर्माण करावा अशी मागणी होत आहे. शहरातल्या इतर मंदिरांच्या सुरक्षा व्यवस्थेचाही पोलीस आढावा घेत असून सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी तीन पथकं स्थापन केली असून सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या