मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /VIDEO: मुलींच्या जीन्सवर टिप्पणी करणं रोड रोमिओला भोवलं; भररस्त्यात तरुणीने दिला चोप

VIDEO: मुलींच्या जीन्सवर टिप्पणी करणं रोड रोमिओला भोवलं; भररस्त्यात तरुणीने दिला चोप

एका तरुणीच्या जीन्सवर टिप्पणी (Road romeo Comment on girls Jeans) करणं रोड रोमिओला चांगलचं भोवलं आहे. रोड रोमिओनं जीन्सवर टिप्पणी केल्यानंतर तरुणीने त्याला भर जत्रेत लाथा आणि बुक्क्यांनी चोप दिला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल (Viral Video) होतं आहे.

पुढे वाचा ...

धमतरी, 20 मार्च: उत्तराखंडचे नवीन मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत (CM Tirath Singh Rawat) यांनी अलीकडेच महिलांच्या फाटक्या जीन्स (Ripped Jeans Statement) बाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे देशभरातील अनेकांनी मुख्यमंत्री तीरथ रावत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. हे प्रकरण ताजं असताना आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. ज्यामध्ये एका तरुणीच्या जीन्सवर टिप्पणी (Road romeo Comment on girls Jeans) करणं रोड रोमिओला चांगलचं भोवलं आहे. रोड रोमिओनं जीन्सवर टिप्पणी केल्यानंतर तरुणीने त्याला भर जत्रेत लाथा आणि बुक्क्यांनी चोप (Young Woman beat road romeo) दिला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल (Viral Video) होतं असून पोलिसांनीही तिचं कौतुक केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना धमतरी जिल्ह्यातील मगरलोड ब्लॉक येथील मधुबन जत्रेत घडली आहे. येथील एक युवती आपल्या काही मैत्रिणीसोबत जत्रेत फिरायला आली होती. यावेळी जत्रेत एका युवकानं तिच्या जीन्सवर आक्षेपार्ह टिप्पणी केली. या टिप्पणीनंतर मुलगी संतापली आणि तिने कसलाही विचार न करता टिप्पणी करणाऱ्या तरुणाला भर जत्रेत कॉलर पकडून चोप दिला. तेथील एकाने या मारहाणीच्या घटनेचं चित्रीकरण केलं आहे. त्यानंतर आता हा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे. स्थानिक लोकांसोबतच पोलिसांनीही संबंधित युवतीचं कौतुक केलं आहे.

" isDesktop="true" id="532368" >

खरंतर मधुबन जत्रेत एक कार्यक्रम सुरू होता. यावेळी या एक युवती आपल्या काही मैत्रिणींसोबत जत्रेत फिरायला आली होती. यावेळी जत्रेतील एका युवकानं तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलीने त्याला समज दिली. मात्र युवकाने त्याची रोड रोमिओगिरी तशीच चालू ठेवली. त्यामुळे संतापलेल्या युवतीने संबंधित युवकाला पकडलं आणि त्याला भर गर्दीच्या ठिकाणी चोप द्यायला सुरुवात केली. तिने युवकाला बऱ्याच लाथा आणि बुक्क्या मारल्या आहेत.

(वाचा -पॉर्न पाहून दारुड्या मुलानं आईवर केला लैंगिक अत्याचार; महाराष्ट्रातली घटना)

संबंधित युवतीनं याबाबत पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. पण पोलिसांनी संबंधित मुलीच्या धैर्याचं कौतुक केलं आहे. तसंच अबला नारी मानसिकतेला छेद देणारं उत्तम उदाहरण असल्याचही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. धमतरीच्या एएसपी मनीषा ठाकूर रावटे यांनी सांगितलं की, छेडछाडी प्रकरणांत महिलांना जागरूक केलं जात आहे. धमतरी पोलीस विविध मोहिमांद्वारे महिला आणि मुलांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime, Viral video.