Home /News /crime /

घरगुती हिंसाचार प्रकरणी टेनिस स्टार लिएंडर पेस दोषी, कोर्टानं सुनावली शिक्षा

घरगुती हिंसाचार प्रकरणी टेनिस स्टार लिएंडर पेस दोषी, कोर्टानं सुनावली शिक्षा

भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस (Leander Paces) घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी असल्याचा निकाल महानगर कोर्टानं दिला आहे.

    मुंबई, 26 फेब्रुवारी : भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस (Leander Paces) घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी असल्याचा निकाल महानगर कोर्टानं दिला आहे. पेसवर त्याची एक्स गर्लफ्रेंड आणि लिव्ह-इन-पार्टनर रिया पिल्लईनं (Riya Pillai) 2014 साली हे आरोप केले होते. त्या प्रकरणात कोर्टानं हा निर्णय दिला आहे. कोर्टानं यावेळी रियाला दर महिन्याचे घर भाडे देण्याचा आदेशही दिला आहे. 6 वर्षांपेक्षा जास्त काळ या प्रकरणाची सुनावणी झााली. टेनिसमधून निवृत्त झालेल्या लिएंडर पेसनं गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश (Trimool Congress) केला आहे. टेनिसपटू लिएंडर पेस आणि अभिनेत्री-मॉडल रिया पिल्लई यांनी दीर्घ काळ एकमेकांना डेट केले. त्यानंतर ते जवळपास 8 वर्ष लिव्ह इनमध्ये होते. या काळात त्यांना मुलगी देखील झाली. तिचे नाव अकीरा आहे. रियानं 2014 साली पेसवर घरगुती हिंसाचाराचा आरोप करत कोर्टामध्ये केस दाखल केली होती. पेसनं आपल्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तिनं केली होती. पेसनं रियाचं भावनिक आणि आर्थिक शोषण केल्याचं कोर्टानं मान्य केलं आहे. तसंच पेसला दर महिना रियाला घरभाडं म्हणून महिना 50 हजार रूपये आणि घराच्या देखभालीसाठी 1 लाख रूपये देण्याचे आदेश दिले आहेत. रिया पेससोबत एकाच घरामध्ये राहिली तर तिला हे पैसे मिळणार नाहीत, असंही कोर्टानं स्पष्ट केलंय. पेसची टेनिस कारकिर्द जवळपास संपुष्टाच आली आहे. त्यामुळे त्याला भाड्याच्या घरात राहण्याचा आदेश देता येणार नाही, असंही कोर्टानं या निकालामध्ये सांगितले आहे. वेबसीरीजमध्ये निवड झाल्याचं सांगत हैदराबादला बोलावलं अन्..; ठाण्यातील अभिनेत्रीसोबत घडला विचित्र प्रकार रिया पिल्लई ही चित्रपट अभिनेता संजय दत्तची माजी पत्नी आहे. तिचा संजय दत्तसोबत घटस्फोट होण्यापूर्वी हे अफेयर सुरू झाले होते. रिया विवाहित असल्याचं आपल्याला माहिती नव्हतं असा दावा पेसनं केला आहे. तर आपण ही कल्पना पेसला दिली होती, असं रियानं म्हटंलं होतं. लिएंडर पेस सध्या चित्रपट अभिनेत्री किम शर्माला डेट करत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bollywood, Crime news, Tennis player

    पुढील बातम्या