तरुणाने जीव जाईपर्यंत 30 वेळा सपासप केले वार, CCTV मध्ये कैद झाला हत्येचा थरार, पाहा VIDEO
Gujrat Crime: गुजरातमध्ये भरदिवसा एका तरुणाची निर्दयी हत्या (Murder) करण्यात आली आहे. ही घटना सुरतमधील (Surat) पुणा परिसरात घडली असून या घटनेचा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
सुरत, 13 डिसेंबर: गुजरातमध्ये (Gujrat) भरदिवसा एका तरुणाची निर्दयी हत्या (Murder) करण्यात आली आहे. ही घटना सुरतमधील (Surat) पुणा परिसरात घडली असून या घटनेचा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ही घटना घडत असताना आजूबाजूला बरेच लोकं ये-जा करत होती, पण कोणीही त्या मृत तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ही घटना आज सकाळी साडे दहाच्या सुमारास सुरत मधील पुणा परिसरात घडली आहे. या फुटेजमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती हातात धारदार शस्त्र घेऊन एका तरुणाचा पाठलाग करत आहे. धावत असताना तो तरुण एका ठिकाणी रस्त्यावर पडला. त्यानंतर पाठलाग करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या हातातील शस्त्राने त्या तरुणाच्या डोक्यावर, पोटावर आणि पायावर 30 पेक्षा अधिक वार केले आहेत. ज्यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना घडत असताना आजूबाजूला बरीच लोकं होती. पण हत्या करणाऱ्या व्यक्तीचा राग पाहता त्याला रोखण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही, याउलट तेथून पटकन काढता पाय घेतला.
सुरतमधील हृदयद्रावक घटना....
आज सकाळी साडेदहाच्या सुमारास ही हत्या झाली असून तरुणांने धारदार शस्त्राने 30 पेक्षा अधिक वार केले आहेत. #viralpic.twitter.com/jeASobOdqK
प्रथमदर्शनी ही हत्या बदलेच्या भावनेतून आणि वैयक्तिक वैमनस्यातून झाली असावी, अशी शंका पोलिसांना आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला पकडण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. पण अद्याप आरोपीची ओळख पटली नाही. तसेच हत्येचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही.