अखिलेश सोनकर (चित्रकूट), 29 मार्च : उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात पूर्व वैमनस्यातून हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. गावातील ग्रामपंचायतीत तंटामुक्त करणाऱ्या गावप्रमुखाच्या मुलाने आपल्याच कुटुंबातील एकाची हत्या केली आहे. रागाच्या भरात लोखंडी रॉडने वार करून हत्या केली. हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
शिवनरेश उर्फ कामटा (70) याचा खून शैलेंद्र कामटा यांचा मुलगा दिनेश सिंग याने खून केला आहे. दरम्यान दिनेश आणि वडील शैलेंद्र या दोघांनी मिळून शिवनरेश यांची हत्या केली. दिनेश याने पाठीमागून येत वार केल्याने शिवनरेश यांची हत्या केली.
टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी आकांक्षानं 'या' अभिनेत्रीला केला होता मेसेज, विचारला होता 'हा' प्रश्न
नातेवाइकांनी त्याला आरोग्य केंद्र पहाडी येथे उपचारासाठी दाखल केले, तेथे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं. जखमी वृद्धाचा जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांनी मृत घोषीत करताच रुग्णालय परिसरातच नातेवाईकांनी हंबरडा फोडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शैलेंद्रचा भाऊ धीरेंद्र याची 3 डिसेंबर 2021 रोजी सोनपूर गावाजवळ हत्या केली होती. त्या घटनेचा बदला घेण्यासाठी शैलेंद्रने शिवनरेशला मागून लोखंडी रॉडने वार करण्यात आला. दरम्यान या घटनेशी शिवनरेशचा काहीही संबंध नव्हता तरीही त्याची हत्या करण्यात आली.
टण टण वाजलं मटण का नाही शिजलं? नवऱ्याने बायकोचा चिरला गळा, पोरीनं पोलिसांना सगळं सांगितलं
याप्रकरणी पोलिस अधीक्षक वृंदा शुक्ला म्हणाले की, पीडितेच्या नातेवाइकांच्या तक्रारीवरून आरोपी तरुणाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे. आरोपींना लवकरच अटक करून पुढील तपास करण्यात येईल असे सांगण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Local18, Uttar pradesh, Uttar pradesh news