Home /News /crime /

200 महिलांची कुऱ्हाडीने केली निर्घृण हत्या; आरोपीनं स्वतःच सांगितलं धक्कादायक कारण

200 महिलांची कुऱ्हाडीने केली निर्घृण हत्या; आरोपीनं स्वतःच सांगितलं धक्कादायक कारण

आरोपीने 200 हून अधिक महिलांची अतिशय निर्घृणपणे हत्या (Man Killed More than 200 Women) केली आहे. या व्यक्तीचं नाव आहे मिखाइल पोपकोव.

    नवी दिल्ली 11 डिसेंबर : तुम्ही चित्रपटांमध्ये अनेक सीरियल किलर (Serial Killer) पाहिले असतील. मात्र, खऱ्या आयुष्यातही अनेक सीरियल किलर असतात. आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वाधिक भयंकर सीरियल किलरबद्दल सांगणार आहोत. याचं नाव ऐकूनच तुमचा थरकाप उडेल. या आरोपीने 200 हून अधिक महिलांची अतिशय निर्घृणपणे हत्या (Man Killed More than 200 Women) केली आहे. या व्यक्तीचं नाव आहे मिखाइल पोपकोव. हा रशियाचा पहिला असा व्यक्ती आहे, जो डबल जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. हेही वाचा - अनैतिक संबंधातून बाळ जन्मले अन् आईने धावत्या लोकलमध्ये सोडून दिले, पण... डेली स्टारमध्ये आलेल्या वृत्तानुसार, मिखाइल पोलिसाची नोकरी करायचा. त्याला जगातील सर्वाधिक भयंकर सीरियल किलर म्हणून ओळखलं जातं. कारण त्याने अनेक महिलांची अतिशय क्रूरपणे हत्या केली आहे. हा आरोपी महिलांची हत्या करण्याआधी अनेक तास त्यांचा कुऱ्हाड, हातोडा, धारदार चाकू आणि हत्यारांनी छळ करायचा. या आरोपीवर 18 ते 50 वर्षाच्या महिलांवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोन वेळा गुन्हा दाखल झाला आहे. त्याने बहुतेक महिलांची हत्या 1992 ते 2010 या काळात केली. ही हत्या प्रकरणे ऐतिहासिक आहेत आणि 1995 आणि 1998 मधील आहेत. 57 वर्षाच्या या आरोपीने एका व्हिडिओमध्ये एका महिलेची हत्या केल्याचं मान्य केलं आहे. या महिलेला त्याने कार्ल मार्क्स स्ट्रीटवर किडनॅप केलं होतं. हेही वाचा - पुण्यातून नोकरीसाठी जर्मनीत शिफ्ट झालं दाम्पत्य; पतीच्या अत्याचाराने ती हादरली! या व्हिडिओमध्ये त्याने जंगलातील ती जागाही दाखवली जिथे त्याने महिलेवर बलात्कार करत तिची हत्या केली. आरोपीनं सांगितलं की त्याने या महिलेला आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितलं. मात्र, तिने नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. यानंतर रागात त्याने या महिलेची हत्या केली.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Murder

    पुढील बातम्या