मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /घरी जाण्यास उशीर झाल्याने अल्पवयीन मुलींचा धक्कादायक निर्णय! अख्ख पोलीस ठाणे लागलं कामाला

घरी जाण्यास उशीर झाल्याने अल्पवयीन मुलींचा धक्कादायक निर्णय! अख्ख पोलीस ठाणे लागलं कामाला

घरी जाण्यास उशीर झाल्याने अल्पवयीन मुलींचा धक्कादायक निर्णय!

घरी जाण्यास उशीर झाल्याने अल्पवयीन मुलींचा धक्कादायक निर्णय!

काशिमिरा येथील तीन मुलींच्या अपहरण प्रकरणाचा रत्नागिरी पोलिसांनी अखेर छडा लावला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Ratnagiri, India

चंद्रकांत बनकर, रत्नागिरी

रत्नागिरी, 7 मार्च : वसई विरार येथे बागेत फिरायला गेलेल्या मुली अचानक गायब झाल्याने खळबळ उडाली होती. अल्पवयीन मुली गायब झाल्याने पालकही घाबरल होते. या संदर्भात त्यांच्या पालकांनी या मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार काशिमिरा पोलीस ठाण्यात केली. यानंतरही पोलिसांनीही घटनेचं गांभीर्य ओळखून तपासचक्र फिरवलं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड पोलिसांनी या तिन्ही मुलींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतलं आहे.

वाचा - मित्रालाच संपवण्याचा रचला कट; आधी घरातून उचललं अन् नंतर.. सांगलीत खळबळ

काय आहे प्रकरण?

वसई विरार येथून पालकांच्या भीतीने निघून आलेल्या तीन अल्पवयीन मुलींना रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड पोलिसांनी आज चक्क मांडवी एक्सप्रेस काही काळ थांबवून त्यांचा शोध घेऊन ताब्यात घेतले आहे. काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या मुली सोमवारी गार्डनमध्ये फिरण्यासाठी गेले होत्या. त्या ठिकाणी उशीर झाला म्हणून पालक ओरडतील या भीतीने घरी न जाता त्या थेट सीएसटी मडगाव या एक्सप्रेसमध्ये बसून कोकणाकडे निघाल्या. या संदर्भात त्यांच्या पालकांनी या मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार काशीदरा पोलीस ठाण्यात केली.

या संदर्भात मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयाकडून या मुली मांडवी एक्सप्रेसमध्ये असल्याबाबत रत्नागिरी पोलिसांना कळवण्यात आलं. खेड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुजित गडदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज मंगळवारी दुपारी बारा वाजता खेड रेल्वे स्टेशनला मांडवी एक्सप्रेस काही काळ थांबवून ठेवत त्या मुलींचा शोध घेतला. त्या एका डब्यात बसलेल्या आढळल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांच्या घरी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासंदर्भात काशिमिरा पोलीस ठाण्यात भादंवि कलम 363 अन्वये या तीन मुलींच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, हे अपहरण नसून पालकांच्या भीतीने या मुली या एक्सप्रेसमध्ये बसून कोकणाकडे आल्याचे निष्पन्न झाले.

First published:
top videos

    Tags: Crime, Ratnagiri