• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • पालिका कर्मचाऱ्याने आपल्याच हाताने गळ्यावर फिरवला सुरा; यापूर्वीही केला होता प्रयत्न

पालिका कर्मचाऱ्याने आपल्याच हाताने गळ्यावर फिरवला सुरा; यापूर्वीही केला होता प्रयत्न

यावेळी त्याची पत्नीही घरात होती.

 • Share this:
  रतलाम, 14 ऑगस्ट : कोरोना काळात अनेक ठिकाणी आत्महत्याच्या (Suicide) बातमी समोर आल्या आहेत. ही सर्व परिस्थिती चिंता वाढवणारी आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूर याच्या आत्महत्येनंतर देशभरात खळबळ उडाली होती. त्याच्या आत्महत्येनंतर मानसिक आरोग्यासह (Mental Health) अनेक गोष्टींवर मोठी चर्चा सुरू झाली होती. मात्र अद्यापही देशात आत्महत्येच्या घटना वारंवार पाहायला मिळत आहे. ही घटना मध्य प्रदेशातील रतलाम येथील असून येथे नगर पालिकेच्या एका कर्मचाऱ्याने अत्यंत क्रूर पद्धतीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. येथील 55 वर्षीय पालिका कर्मचाऱ्याने आपल्या हाताने गळ्यावर सुरा फिरवून आत्महत्या केली. यापूर्वीही या कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहे आणि त्याच्या आत्महत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. (ratlam news : Suicide of a municipal employee in his own house) हे ही वाचा-..म्हणून नातवानं फ्रीजमध्ये लपवून ठेवला आजोबांचा मृतदेह; कारण ऐकून बसेल धक्का काय आहे प्रकरण? ही घटना शनिवारी सकाळी रतलाम शहरातील सुभाष नगर येथे घडली. येथे राहणाऱ्या 55 वर्षीय गोपाळ चतुर्भूज यांनी आपल्यात घरात गळ्यावर सुरा फिरवून आत्महत्या केली. गोपाळ चतुर्भूज नगर पालिकेत सफाई कर्मचारी होते. आणि पत्नीसह राहत होते. गोपाळ यांना तीन मुलं आहे. ते आपल्या आई-वडिलांपासून वेगळं राहत होते. सांगितलं जात आहे ही गोपाळ यांनी यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाळ गेल्या अनेक वर्षांपासून आजारी होते. त्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या प्रकरणात पोलिसांनी पोस्टमार्टमनंतर गोपाळ यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
  Published by:Meenal Gangurde
  First published: