• Home
  • »
  • News
  • »
  • crime
  • »
  • Ration Card: रेशन केंद्रावर तुमचीही होतेय फसवणूक? त्वरित या क्रमांकावर करा संपर्क

Ration Card: रेशन केंद्रावर तुमचीही होतेय फसवणूक? त्वरित या क्रमांकावर करा संपर्क

रेशन कार्डचे कित्येक फायदे आहेत. याचा मूळ उद्देश हा स्वस्त दरात धान्य मिळवून देणं आहे; पण कित्येक वेळा, रेशन दुकानदारांच्या मनमानी कारभारामुळे या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जातो. रेशन देण्यास टाळाटाळ करणे, जास्त पैसे घेणं किंवा मग ठरवून दिलेल्या वजनापेक्षा कमी धान्य देणं असे प्रकार (Fraud at Ration Centre) बऱ्याच वेळा पाहायला मिळतात.

  • Share this:
    मुंबई, 25 नोव्हेंबर-   रेशन कार्डचे कित्येक फायदे आहेत. याचा मूळ उद्देश हा स्वस्त दरात धान्य मिळवून देणं आहे; पण कित्येक वेळा, रेशन दुकानदारांच्या मनमानी कारभारामुळे या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जातो. रेशन देण्यास टाळाटाळ करणे, जास्त पैसे घेणं किंवा मग ठरवून दिलेल्या वजनापेक्षा कमी धान्य देणं असे प्रकार   (Fraud at Ration Centre)   बऱ्याच वेळा पाहायला मिळतात. कित्येक वेळा वाद नको म्हणून नागरिक याबाबत तक्रार  (Complaint against Ration Dealer)  करणं टाळतात. कित्येक वेळा तक्रार करायची असूनही, कुठे करायची याबाबत माहिती नसल्यामुळे नागरिक मागे राहतात. यामुळेच अशा भ्रष्ट रेशन दुकानदारांचा आत्मविश्वास अधिक वाढतो. बऱ्याच जणांना माहिती नसेल, मात्र या रेशन दुकानदारांविरोधात तक्रार करण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्यनिहाय हेल्पलाइन नंबर (Ration Card helpline number)  प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्हालादेखील रेशन दुकानदार (Complaint against Ration shop owner) कमी धान्य देत असेल, तर त्याच्या विरोधात तुम्ही थेट तक्रार नोंदवू शकता. विशेष म्हणजे हा क्रमांक टोल फ्री आहे. त्यामुळे तुम्ही भ्रष्ट रेशन दुकानदारांविरोधात अगदी मोफत (Toll Free helpline number) तक्रार नोंदवू शकता. देशातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या हक्काचं धान्य मिळावं यासाठी हे हेल्पलाइन नंबर्स प्रसिद्ध करण्यात आले आहेत. कोणत्या राज्यासाठी कोणता टोल फ्री क्रमांक आहे याची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही नॅशनल फूड सिक्युरिटी विभागाच्या (National Food Security Portal) वेबसाइटला भेट देऊ शकता. https://nfsa.gov.in/portal/State_UT_Toll_Free_AAया लिंकवर क्लिक करून तुम्हाला सर्व राज्यांच्या हेल्पलाइन क्रमांकांची यादी मिळेल. केवळ धान्याच्या पुरवठ्याबाबतच नाही, तर रेशन कार्डसंबंधी कोणत्याही गोष्टीची तक्रार तुम्ही या पोर्टलवर (Ration Card portal) जाऊन करू शकता. कित्येक वेळा रेशन कार्डची नोंदणी करूनही कित्येक महिने तुम्हाला ते मिळत नाही, याबाबतही तुम्ही या पोर्टलवर तक्रार करू शकता. राज्यनिहाय हेल्पलाइन क्रमांक पुढीलप्रमाणे आंध्र प्रदेश 1800 425 2977 अरुणाचल प्रदेश 03602244290 आसाम 1800 345 3611 बिहार 1800 3456 194 छत्तीसगड 1800 233 3663 गोवा 1800 233 0022 गुजरात 1800 233 5500 हरियाणा 1800 180 2087 हिमाचल प्रदेश 1800 180 8026 झारखंड 1800 345 6598, 1800 212 5512 कर्नाटक 1800 425 9339 केरळ 1800 425 1550 मध्य प्रदेश 181 महाराष्ट्र 1800 22 4950 मणिपूर 1800 345 3821 मेघालय 1800 345 3670 मिझोराम 1860 222 222 789, 1800 345 3891 नागालँड 1800 345 3704, 1800 345 3705 ओडिशा 1800 345 6724 / 6760 पंजाब 1800 3006 1313 राजस्थान 1800 180 6127 सिक्कीम 1800 345 3236 तमिळनाडू 1800 425 5901 तेलंगण 1800 4250 0333 त्रिपुरा 1800 345 3665 उत्तर प्रदेश 1800 180 0150 उत्तराखंड 1800 180 2000, 1800 180 4188 पश्चिम बंगाल 1800 345 5505 दिल्ली 1800 110 841 जम्मू 1800 180 7106 काश्मीर 1800 180 7011 अंदमान आणि निकोबार 1800 343 3197 चंडीगड 1800 180 2068 दादरा, नगर हवेली आणि दमण-दीव 1800 233 4004 लक्षद्वीप 1800 425 3186 पुदुच्चेरी 1800 425 1082 नवीन रेशन कार्ड कसं काढायचं? नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी (How to apply for Ration Card) तुम्हाला तुमच्या राज्याच्या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल. त्या ठिकाणी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट किंवा सरकारने जारी केलेलं कोणतंही ओळखपत्र, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यांचा उपयोग केला जाऊ शकतो. यासोबतच तुम्हाला पाच ते 45 रुपयांपर्यंत (रेशन कार्डच्या प्रकारानुसार) फी भरावी लागेल. फॉर्म सबमिट झाल्यानंतर फिल्ड व्हेरिफिकेशन करण्यात येतं. तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्याची खात्री पटल्यानंतर तुम्हाला रेशन कार्ड दिलं जातं.
    First published: