पंढरपूर, 31 डिसेंबर : एकीकडे राज्यातील सहकारी बँकामधील व्यवहारामध्ये अनियमितता आढळून आल्यामुळे दोन बँकांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. तर दुसरीकडे पंढपूरमधील (Pandharpur) रतनचंद शहा बँकेच्या (Ratanchand Shah Bank) टेंभुर्णी शाखेत तब्बल साडे पाच कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा प्रकार समोर आला आहे.
रतनचंद शहा सहकारी बँकेच्या टेंभुर्णी शाखेत साडे पाच लाख रुपयांचा अपहार झाला असून बँकेचा तत्कालीन शाखाधिकारी आणि रोखपाल यांच्याविरोधात बँकेचे सरव्यवस्थापक अरविंद नाझरकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
विराट आणि अनुष्काने जन्माआधीच बाळासाठी घेतला एक कौतुकास्पद निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवेढा येथील रतनचंद शहा बँकेच्या टेंभुर्णी शाखेत 2016 ते 2020 या कालावधीत बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या टेम्भुर्णी शाखेच्या खात्यावरील तसंच हातावरील शिल्लक अशा एकूण 5 कोटी 57 लाख 2 हजार 822 रुपयांचा अपरातफर केली आहे. या प्रकरणी बँकेचे तत्कालीन सेवानिवृत्त शाखाधिकारी हरिदास निवृत्ती राजगुरू ( रा. सांगोला ) तसंच तत्कालीन रोखपाल अशोक भास्कर माळी ( रा.टेम्भुर्णी , ता.माढा ) यांच्याविरोधात बँकेचे सरव्यवस्थापक अरविंद नाझरकर यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तसंच तपास कामी पथके नेमून आरोपींचा शोध सुरू केला आहे. रतनचंद शहा बँकेच्या टेंभुर्णी अफरातफरीवरुन सभासद आणि ठेवीदांरामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, संचालक मंडळाने संबंधित दोषींवर तक्रार दाखल केली असून ठेवीदारांनी घाबरून न जाता सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.