मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

भयानक! 15 वर्षाच्या मुलीला फूस लावून लॉजमध्ये 17 दिवस डांबले, तिघांकडून बलात्कार

भयानक! 15 वर्षाच्या मुलीला फूस लावून लॉजमध्ये 17 दिवस डांबले, तिघांकडून बलात्कार

ही धक्कादायक घटना विरारच्या अर्नाळा येथे घडली.

ही धक्कादायक घटना विरारच्या अर्नाळा येथे घडली.

ही धक्कादायक घटना विरारच्या अर्नाळा येथे घडली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Vasai-Virar City, India
  • Published by:  Khushalkant Dusane

मुंबई, 19 नोव्हेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अनैतिक संबंधातून आत्महत्या, खून यासांरख्या घटना समोर येत आहेत. दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्यांकाडाने देशात खळबळ उडालेली असतानाच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लॉजमध्ये 17 दिवस डांबून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

ही धक्कादायक घटना विरारच्या अर्नाळा येथे घडली. या प्रकरणी तीन जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरारच्या अर्नाळा येथील लॉजमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन तरुणीला तब्बल 17 दिवस डांबून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने या मुलीची सुटका करून तिच्यावर बलात्कार करणार्‍या तिघांना अटक केली आहे.

15 वर्षांची ही पीडित तरुणी वसईत राहते. तिची ओळख लक्ष्मण शेट्टी याच्यासोबत झाली होती. शेट्टीने तिला 1 नोव्हेंबर रोजी विरारच्या अर्नाळा येथील सी साईट नावाच्या लॉजिंगमध्ये फूस लावून आणले होते. तसेच याठिकाणी तिला बळजबरीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. यानंतर लक्ष्मण तेथून पसार झाला. या मुलीच्या असहायतेचा फायदा घेत लॉज चालक आकाश गुप्ता आणि कर्मचारी सुशांत पुजारी या दोघांनीही तिच्यावर बलात्कार केला आणि तिला कोंडून ठेवले होते.

हेही वाचा - साखरपुड्यानंतर बळजबरीने ठेवले शारिरीक संबंध, तरुणी गर्भवती झाल्यावर मोडलं लग्न, पुढे काय घडलं?

या प्रकाराची माहिती अनैतिक मानवी वाहतूक शाखेला मिळाली होती. यानंतर पोलिसांनी लॉजवर छापा टाकून पीडित मुलीची सुटका केली आहे. तसेच तिला डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Rape, Vasai