• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • महिलेवर बलात्कार करून तिचा प्रायव्हेट पार्ट जाळला; 17 वर्षीय तरुणाचं महाभयंकर कृत्य

महिलेवर बलात्कार करून तिचा प्रायव्हेट पार्ट जाळला; 17 वर्षीय तरुणाचं महाभयंकर कृत्य

आतापर्यंत बलात्काराच्या अनेक घटना पाहिल्या असतील, मात्र या घटनेने संपूर्ण देशालाच हादरा दिला.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : राजधानी दिल्लीतील (Delhi News) द्वारका भागात एक महिलेवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात पोलिसांनी एका 17 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. या मुलाने महिलेची हत्या (Murder after rape) केल्यानंतर पुरावे मिटवण्यासाठी तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये (Private Part) आग लावली होती. या प्रकरणात तपासादरम्यान तब्बल 2700 जणांची चौकशी करण्यात आली, याशिवाय अनेक सीसीटीव्ही फुटेजदेखील तपासण्यात आले. (Raped a woman and burned her private parts Terrible act of a 17 year old youth) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 नोव्हेंबर रोजी दिल्ली पोलिसांना याबाबत सूचना मिळाली होती. त्यानुसार, महिलेचा मृतदेह नाल्याजवळील कचऱ्यात पडलेला होता. पोलिसांनी महिलेच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम केले. या तपासात पोलिसांनी 17 नोव्हेंबर रोजी हत्याच्या आरोपाखाली एका तरुणाा अटक केली. चौकशीदरम्यान आरोपीने पोलिसांना सांगितलं की, त्याने महिलेवर बलात्कार केला. पकडले जाऊ या भीतीने त्याने महिलेचा गळा दाबून हत्या केली. याशिवाय पुरावे मिटवण्यासाठी त्याने महिलेच्या प्रायव्हेट पार्टला आग लागली. हे ही वाचा-होमवर्क न केल्याबद्दल पित्याने दिली राक्षसी शिक्षा, आईने रेकॉर्ड केला VIDEO मृत महिलेबाबत पोलिसांचा तपास सुरू होता. बराच वेळ महिलेबाबत कोणतीच माहिती हाती लागली नव्हती. यामुळे विशेष टीमने या प्रकरणात तपास सुरू केला. पोलिसांनी पीडित महिलेचा फोटो विविध व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठला. शेवटी हा फोटो पीडितेच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचला. यानंतर महिलेची ओळख पटली. आता पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून बलात्काराच्या आरोपाखाली तरुमाला अटक केली आहे. आरोपीला आयपीसी कलम 302 हत्या आणि 201 अंतर्गत गुन्ह्याचे पुरावे मिटवणे आदी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: