Home /News /crime /

पती आणि मुलांसोबत झोपलेल्या महिलेवर बलात्कार, एका गैरसमजामुळे घडलं भलतंच

पती आणि मुलांसोबत झोपलेल्या महिलेवर बलात्कार, एका गैरसमजामुळे घडलं भलतंच

काकाचं भूत अंगात शिरल्याचं सांगत अल्पवयीन मुलीवर भोंदूबाबाचा बलात्कार, भिवंडीतील धक्कादायक घटना (प्रातिनिधिक फोटो)

काकाचं भूत अंगात शिरल्याचं सांगत अल्पवयीन मुलीवर भोंदूबाबाचा बलात्कार, भिवंडीतील धक्कादायक घटना (प्रातिनिधिक फोटो)

महिलेनं आरोपीला (Criminal) आपला पतीच (Husband) असल्याचं समजलं. मात्र, तिला जेव्हा या गोष्टीची जाणीव झाली की हा आपला पती नसून कोणीतरी दुसराच व्यक्ती आहे, तेव्हा ती मोठ्यानं ओरडली

    भोपाळ 20 मे: बलात्काराची (Rape) एक विचित्र घटना समोर आली आहे. या घटनेत बलात्कार झाला त्यावेळी महिलेचा पती आणि तिची मुलंही शेजारीच झोपलेली होती. मात्र, महिलेनं आरोपीला आपला पतीच असल्याचं समजलं. मात्र, तिला जेव्हा या गोष्टीची जाणीव झाली की हा आपला पती नसून कोणीतरी दुसराच व्यक्ती आहे, तेव्हा ती मोठ्यानं ओरडली. महिलेचा आवाज ऐकून पती झोपेतून उठला. त्यानं आरोपीला पडकण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत आरोपी (Criminal) फरार झाला. ही घटना मध्य प्रदेशच्या (Crime in Madhya Pradesh) रीवा येथील आहे. हे प्रकरण मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यातील मऊगंज येथील आहे. महिला आपला पती आणि दोन मुलांसोबत एका खोलीत झोपली होती. रात्रीच्या अंधारात एक अज्ञात व्यक्ती तिच्या खोलीत आला. या व्यक्तीनं महिलेवर बलात्कार केला. सुरुवातीला महिलेला वाटलं, की हा आपला पतीच आहे. मात्र, तिला काही वेळातच याची भनक लागली की हा दुसराच व्यक्ती आहे. यानंतर महिलेनं मोठमोठ्यानं ओरडायला सुरुवात केली. महिलेचा आवाज ऐकून तिचा पती झोपेतून जागा झाला. महिलेनं ओरडायला सुरुवात करताच आरोपी सावध झाला. महिलेच्या पतीनं त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना धक्का देत आरोपी घटनास्थळाहून पसार झाला. पतीनं त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, रात्रीच्या अंधरात आरोपी कुठे गायब झाला, याचा तपास लागला नाही. घटनेनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पीडित महिला आपल्या पतीसह पोलीस ठाण्यात पोहोचली. तिनं पोलिसांनी आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. महिलेनं सांगितलं, की रात्री खोलीचा दरवाजा उघडा होता. त्यामुळे, हा व्यक्ती सहजरित्या घरात येऊ शकला. महिलेची तक्रार गांभीर्यानं घेत मऊगंज एएसपी विजय डाबर यांनी तपासाचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा तपास महिला अधिकाऱ्याकडे सोपवला गेला आहे. विजय डाबर यांनी सांगितलं, की प्रकरणाचा तपास सुरू आहे. महिलेनं दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जाईल.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Rape

    पुढील बातम्या