मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /मावशीच्या घरातून परतताना बहिणींसोबत घडलं घृणास्पद कृत्य; दोन दिवसांनी जंगलात सापडल्या

मावशीच्या घरातून परतताना बहिणींसोबत घडलं घृणास्पद कृत्य; दोन दिवसांनी जंगलात सापडल्या

आपल्या मावशीच्या घरून परत आपल्या गावी जाणाऱ्या दोन अल्पवयीन बहिणींवर बलात्कार (Rape on two minor sisters) केल्याची घटना समोर आली आहे.

आपल्या मावशीच्या घरून परत आपल्या गावी जाणाऱ्या दोन अल्पवयीन बहिणींवर बलात्कार (Rape on two minor sisters) केल्याची घटना समोर आली आहे.

आपल्या मावशीच्या घरून परत आपल्या गावी जाणाऱ्या दोन अल्पवयीन बहिणींवर बलात्कार (Rape on two minor sisters) केल्याची घटना समोर आली आहे.

गढवा, 22 फेब्रुवारी: आपल्या मावशीच्या घरून परत आपल्या गावी जाणाऱ्या दोन अल्पवयीन बहिणींवर बलात्कार (Rape on two minor sisters) केल्याची घटना समोर आली आहे. मावशीच्या घरून परत येत असताना दोन युवकांनी त्यांचा रस्ता आडवून बाजूच्या जंगलात (Forest) नेणून त्यांच्यावर बलात्कार केला आहे. नराधम एवढ्यावरचं थांबले नाहीत, तर त्यांनी दोन दिवस पीडित मुलींना जंगलात डांबून ठेवलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून घटनेचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही पीडित मुली चुलत बहिणी असून त्या झारखंडमधील गढवा येथील रहिवाशी आहेत. त्या 10 फेब्रुवारी रोजी बेलवादामर येथे आपल्या मावशीच्या घरी गेल्या होत्या. याठिकाणी 8 दिवस राहिल्यानंतर गुरुवारी त्या आपल्या गावी परत चालल्या होत्या. पण वाटेतच बांदू बाजारच्या पुढे गेल्यानंतर त्यांना रविचंदन सिंग आणि कालेश्वर सिंह या दोन तरुणांनी त्यांचा रस्ता आडवला. दोन्ही तरुणांनी या अल्पवयीन मुलींना जबरदस्तीने जंगलात ओढत नेले. त्यानंतर दोघींवर बलात्कार करण्यात आला. क्रूरतेचा कळस म्हणजे आरोपींनी पुढचे दोन दिवस दोघींना जंगलातच बंधक बनवून ठेवलं.

पण दोन दिवसांनी नराधमांच्या तावडीत दोन्ही बहिणींनी आपली सुटका करून घेतली आणि एका मैत्रिणीच्या घरी पोहोचल्या. दरम्यान, दुसरीकडे पीडित मुलीपैकी एका मुलीच्या वडिलांनी रंका पोलीस ठाण्यात मुली हरवल्याची तक्रार दिली. तक्रारीनंतर 19  फेब्रुवारी रोजी रंका पोलिसांनी तातडीने पावलं उचलत कुटुंबातील काही सदस्यांच्या मदतीने पीडित मुलींना शोधून काढलं आहे. दोन्ही अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी बलात्काराच्या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

हे ही वाचा- अल्पवयीन मुलीशी लग्न; पतीने वडिलांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास पाडलं भाग

त्यानंतर अल्पवयीन मुलींच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही तरुणांवर गुन्हा दाखल केला आला. दोन्ही अल्पवयीन मुलांना वैद्यकीय तपासणीसाठी गढवा येथे पाठविण्यात आलं आहे. तसेच दोन्ही आरोपींना अटक करून पुढील कारवाई केली जात आहे.

First published:

Tags: Crime news, Rape