हरदोई, 1 मे : दिवसेंदिवस लैंगिक अत्याचार, बलात्कार, नात्यात फसवणूक, प्रेमी युगुलाची हत्या यांसारखे प्रकरणे समोर येत आहे. यातच आता अल्पवयीन मुलीवर बलात्कार (rape on minor) करून तिचा व्हिडिओ बनवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील हरदोई येथील लोणार परिसरातील एक गावात घडली आहे. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यावर ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
काय आहे नेमके प्रकरण :
मिळालेली माहिती अशी की, आरोपी मुलगा आणि पीडित मुलगी दोघांमध्ये चांगली ओळख होती. आरोपीने या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ बनवला. यानतंर तो व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी देत तो तिला गाडीमध्ये फिरवत होता. मुलगी जेव्हा गरोदर राहिली तेव्हा ही धक्कादायक घटना समोर आली.
याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत पीडित मुलीच्या वडिलांनी आरोप केला आहे की, त्यांची मोठी मुलगी आपल्या लहान बहिणीला सोबत घेऊन शाळेत सोडायला जात होती. याचदरम्यान, आरोपी पीडितेला भेटायचा आणि तिला गाडीत फिरवायचा. यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल करुन टाकेन, अशी धमकी देत तिचे लैंगिक शोषण करत राहिला. मुलगी जेव्हा गरोदर राहिली तेव्हा ही धक्कादायक घटना समोर आली. आरोपीसुद्धा अल्पवयीन आहे.
हेही वाचा - पत्नीने लग्नाच्या पहिल्या रात्री पतीला सँडलने धू धू धुतलं अन् वीज-पाण्याचं कनेक्शनही तोडलं!
नातेवाईकांनी याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी प्रथम दर्शन अहवाल (FIR) नोंदवला. पीडितेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक राजेश द्विवेदी यांनी सांगितले की, प्रथम दर्शन अहवाल (FIR) नोंदवला असून याप्रकरणी पुढील तपास केला जात आहे.
जिच्यावर प्रेम होतं तिच्यावर केला हल्ला, तिच्या भावालाही संपवलं अन्..
उत्तर प्रदेशातील पीलीभीतमध्ये (pilibhit) शनिवारी एका विक्षिप्त प्रेमीने खळबळ उडवून दिली. प्रेमाच्या नावाखाली एका विक्षिप्त तरुणाने आधी मुलीच्या भावाची गोळ्या झाडून हत्या (murder in pilibhit) केली आणि नंतर स्वत:वरही गोळी झाडली. य़ा घटनेत त्या मुलीच्या भावाचा जीव तर गेलाच आहे पण त्या तरुणाने देखील जीव गमावला आहे. रिंकू गंगवार असे आरोपीचे (accused) नाव आहे. त्याने मुलगी आणि तिच्या आईला जखमी केले होते. ही घटना पीलीभीतमधील अमरिया पोलीस स्टेशन (ameria police station) हद्दीतील सिरसा गावात घडली.
हा तरुण एक मुलगी पसंत करत होता आणि तिच्यासोबत प्रेमाचा दावाही करत होता. मात्र, तिचे लग्न दुसरीकडे निश्चित झाले होते. तर तरुण बहेडीच्या हरिहरपूर येथील आहे. त्याचे वय 19 इतके होते. त्याला सिरसा येथील 22 वर्षीय मुलीवर प्रेम आहे, असा दावा त्याने केला होता. शनिवारी सकाळी तो थेट मुलीच्या घरी गेला होता. तेथे पोहोचताच त्याने मुलीच्या आईवर हल्ला केला. त्याने तिथे उपस्थित असलेल्या मुलीलाही सोडले नाही, जिच्यावर त्याने प्रेम केल्याचा दावा केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rape news, Rape on minor, Uttar pradesh news