Home /News /crime /

पुणे हादरलं, दोन वेगवेगळ्या घटनेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे हादरलं, दोन वेगवेगळ्या घटनेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

बीड जिल्ह्यातील परळी इथं राहणारे एक कुटुंब मोलमजुरीसाठी पुण्यात आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

पुणे, 30 ऑक्टोबर : पुण्यातील (Pune) हडपसर पोलीस (Hadapsar Police Station) स्टेशनच्या हद्दीत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये बलात्कार (Rape) करण्यात आल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील परळी इथं राहणारे एक कुटुंब मोलमजुरीसाठी पुण्यात आलं होतं. आई-वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. या गरीब दाम्पत्याची  मुलगी अल्पवयीन आणि जराशी भोळसट आहे. त्याचाच फायदा घेऊन एका आरोपीने तिला दोन दिवस सोबत ठेवलं आणि तिच्या सोबत संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पुन्हा तिला सोडून दिलं. त्याने सोडून दिल्यानंतर पीडित मुलगी एक दिवस घरी येऊन राहिली होती. पण, त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपीला शोधण्यासाठी बाहेर पडली. विधवा सूनेचं प्रेमप्रकरण समजताच सासऱ्यानं तिच्यासह प्रियकराला ट्रॅक्टरनं चिरडलं बाहेर फिरत असताना एका रिक्षाचालकाने तिच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने 'तुला त्याच्याकडे नेऊन सोडतो' असं सांगून रिक्षाचालक तिला सोबत घेऊन गेला आणि तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले. या घटनेमुळे भेदारलेल्या पीडित मुलीनं घरं गाठले आणि आपल्यासोबत घडलेली सर्व हकीकत कुटुंबीयांना सांगितली. फ्रान्स नंतर आता रशियाही हादरला, 'अल्लाहू अकबर'ची घोषणा देत तरुणाचा... त्यानंतर पीडितेसह कुटुंबीयांनी  हडपसर पोलीस स्टेशन गाठले. 26 ऑक्टोबर रोजी यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपासाची चक्र फिरवली. अखेर चार दिवसांत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आणखी एका आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Pune, Rape, पुणे

पुढील बातम्या