मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

बंदुकीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; विरोध करणाऱ्या कुटुंबियांनाही केली मारहाण

बंदुकीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; विरोध करणाऱ्या कुटुंबियांनाही केली मारहाण

काकाचं भूत अंगात शिरल्याचं सांगत अल्पवयीन मुलीवर भोंदूबाबाचा बलात्कार, भिवंडीतील धक्कादायक घटना (प्रातिनिधिक फोटो)

काकाचं भूत अंगात शिरल्याचं सांगत अल्पवयीन मुलीवर भोंदूबाबाचा बलात्कार, भिवंडीतील धक्कादायक घटना (प्रातिनिधिक फोटो)

Minor girl Rape: आरोपीने बंदुकीचा धाक दाखवून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला (Rape on Minor girl) आहे. पीडितेच्या घरच्यांनी आरोपीला रंगेहाथ पकडल्यानंतर त्याने पीडितेच्या कुटुंबालाही मारहाण केली आहे.

  • Published by:  News18 Desk

नूह-मेवात, 5 एप्रिल : देशात दिवसेंदिवस महिला विरोधी अत्याचारांच्या (Crime against women) घटना वाढतच चालल्या आहेत. अगदी कौटुंबिक हिंसाचारापासून बलात्कारापर्यंतच्या (Rape) अनेक घटना देशात दररोज नोंदवल्या जात आहे. कडक शासन करूनही गुन्हेगारांना काहीही फरक पडत नाही. अशातचं एका व्यक्तीने बंदुकीचा धाक दाखवून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला (Rape on minor girl) आहे. क्रूरतेचा कळस म्हणजे पीडितेच्या घरच्यांनी याला विरोध केला असता आरोपीने त्यांनाही मारहाण केली आहे. या संतापजनक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित घटना हरियाणातील नूह-मेवात येथील आहे. पुन्हाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका 13 वर्षीय मुलीवर एका युवकाने पाशवी बलात्कार केला आहे. त्याने पीडित मुलीला बंदुकीचा धाक दाखवत भुसाच्या खोलीत नेवून तिच्यावर बलात्कार केला. संबंधित आरोपी पीडितेच्या गावातीलच रहिवासी आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईनं पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलीच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादीची 13 वर्षीय मुलगी शनिवारी सायंकाळी शौचासाठी जंगलाच्या दिशेनं गेली होती. यावेळी गावातील वकिल नावाच्या युवकानं तिला जबरदस्ती पकडलं आणि बंदुकीचा धाक दाखवत जवळच्याच एका भुसाच्या खोलीत नेलं. त्याठिकाणी आरोपीनं तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीचा ओरडल्याचा आवाज ऐकून पीडितेचा काका घटनास्थळी दाखल झाला. त्याने आरोपीला रंगेहाथ पकडलं.

(वाचा - प्रियकराने न्यूड फोटोची केलेली मागणी जीवावर बेतली; अल्पवयीन मुलीची आत्महत्या)

परंतु आरोपीनं फारूखवरच हल्ला केला. तो एवढ्यावरचं थांबला नाही, तर त्याने आणखी अर्धा डझन लोकांना फोन करून बोलावून घेतलं. आणि त्याने आणि आपल्या साथीदारांच्या मदतीने फारूखला दांडक्यांनी मारहाण केली. याची माहिती मिळताच कुटुंबातील अन्य सदस्यही घटनास्थळी पोहचले. आरोपींनी त्यांच्याशीही वाद घालत त्यांनाही मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.

First published:

Tags: Crime news, Haryana, Rape on minor