Home /News /crime /

ICU मध्ये व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देणाऱ्या तरुणीवर बलात्कार; आरोपीची ओळख पटली मात्र...

ICU मध्ये व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देणाऱ्या तरुणीवर बलात्कार; आरोपीची ओळख पटली मात्र...

तरुणीवर क्षयरोगाचे उपचार सुरू आहेत, तिला श्वास घेण्यासही अडचण येत आहे. व्हेंटिलेटरवर अर्धवट शुद्धीत असताना तिच्यावर बलात्कार झाला

    नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : (Girl Patient Raped in ICU of a Private Hospital) दिल्लीतील गुरुग्राम येथील एका खासगी रुग्णालयातील आयसीयूमध्ये भरती असलेल्या एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुग्राममधील सेक्टर 44 मधील फोर्टिस रुग्णालयात टीबीशी झुंज देणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना आहे. तरुणीची प्रकृती गंभीर असल्या कारणाने तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. ती व्हेंटिलेटरवर अर्धवट शुद्धीत असताना तिच्यावर बलात्कार झाला. पोलिसांनी सांगितले की, तरुणीला मंगळवारी जेव्हा शुद्ध आली तेव्हा तिने वडिलांना याबाबत माहिती दिली. तिने कागदावर तिच्यासोबत घडलेला प्रसंग लिहून वडिलांकडे दिला. त्यानंतर कुटुंबीयांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी सांगितले की, कुटुंबीयांनी सांगितल्यानुसार ही घटना 21 ते 27 ऑक्टोबरदरम्यान झाली आहे. तरुणीला 21 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर तरुणीला 27 ऑक्टोबर रोजी शुद्ध आली. पीडित तरुणी सध्या त्याच रुग्णालयात उपचार घेत आहे. हे ही वाचा-लॉकडाऊनमध्ये जुळलं प्रेम..ऑगस्टमध्ये लग्न आणि ऑक्टोबरमध्ये हत्या! पीडित तरुणी ही महेंद्रगढमधील राहणारी आहे. तिला श्वास घेण्यात त्रास होत असल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तिच्यावर टीबीचे उपचार सुरू आहेत. तिला आयसीयूमध्ये एका खासगी रुममध्ये ठेवण्यात आले होते. गुरुग्रामच्या असिस्टेंट पोलीस कमिश्नर उषा कुंदू यांनी सांगितले की, पीडित तरुणीचे वडील तिला भेटायला गेले तेव्हा तिने वडिलांनी लिहून तिच्यासोबत बलात्कार झाल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की सुरुवातीला रुग्णालयाने याबाबतचा तपास केला आहे. पोलिसांना याबाबतच माहिती दिल्यानंतर आयपीसी कलम 376 (2) ईअंतर्हत गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी सांगितले की, आरोपीची ओळख पटविण्यात आली असून अद्याप त्याला अटक करण्यात आलेले नाही.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Rape

    पुढील बातम्या