Home /News /crime /

लग्नाचं आमिष दाखवून महिलेवर वर्षभर बलात्कार, तक्रार केल्यावर दिली जीवे मारण्याची धमकी

लग्नाचं आमिष दाखवून महिलेवर वर्षभर बलात्कार, तक्रार केल्यावर दिली जीवे मारण्याची धमकी

पीडित महिलेनं लग्नाची मागणी लावून धरल्यानंतर तिला मारहाण करण्यात आली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात परिसरातील प्रसिद्ध व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पलवल, 05 सप्टेंबर : लग्न (Marriage) करण्याचं आमिष दाखवून वर्षभर एका महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्न करण्याचं आश्वासन देऊन जवळपास वर्षभर शारीरिक संबंध ठेवल्यानंतर आरोपीने लग्न करण्यास नकार दिला. पीडित महिलेनं लग्नाची मागणी लावून धरल्यानंतर तिला मारहाण करण्यात आली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात परिसरातील प्रसिद्ध व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपी अद्याप पोलीस कोठडीच्या बाहेर आहे. पोलीस तपास अधिकारी एएसआय रेणू यांनी सांगितलं की, पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे. ती स्वतःच्या पतीपासून वेगळी राहात असून तिचा पतीविरोधात घटस्फोटासाठी न्यायालयात खटला सुरू आहे. ती 25 सप्टेंबर 2020 पासून तिच्या प्रियकरासोबत पलवलमधील एका कॉलनीत राहात आहे. तो मढनाका गावाचा रहिवासी आहे. या व्यक्तीनं लग्नाचं आमिष दाखवत पीडितेशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, 28 ऑगस्टला तिनं त्याला लग्नाविषयी विचारलं असता त्यानं साफ नकार देत तिला मारहाण केली. यानंतर पीडितेनं पोलिसांत तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे. हे वाचा - उत्पन्न नसतानाही ही व्यक्ती भरतेय हजारोंचा Income Tax, कारण ऐकून व्हाल थक्क पलवल पोलीस तपास अधिकारी एसआय सुरेखा यांनी सांगितलं की, जिल्ह्यात 6 दिवसांपूर्वी असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. त्या प्रकरणात एका 26 वर्षीय महिलेशी लग्नाचं आमिष दाखवत आरोपीनं शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली. यादरम्यान पीडिता गर्भवती झाली असता आरोपीनं तिला गर्भपात करण्यास भाग पाडलं. तिच्याशी चार वर्षे संबंध ठेवल्यानंतर त्यानं तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. पीडितेनं याविषयी त्याच्याशी वादावादी केली असता आरोपीसह त्याच्या घरच्यांनीही पीडितेला मारहाण केली. तसंच जीवे मारण्याची धमकीही दिली.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Marriage, Rape news

    पुढील बातम्या