मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर 5 महिने अत्याचार, अखेर पीडितेने घडवली कायमची अद्दल!

जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर 5 महिने अत्याचार, अखेर पीडितेने घडवली कायमची अद्दल!

या दोन्ही आरोपींनी गावात यापूर्वीही 5 ते 6 वेळा गावातील मुलींची छेडछाड करुन त्यांच्यावर अत्याचार केले.

या दोन्ही आरोपींनी गावात यापूर्वीही 5 ते 6 वेळा गावातील मुलींची छेडछाड करुन त्यांच्यावर अत्याचार केले.

या दोन्ही आरोपींनी गावात यापूर्वीही 5 ते 6 वेळा गावातील मुलींची छेडछाड करुन त्यांच्यावर अत्याचार केले.

पुणे, 26 ऑक्टोबर : जिल्ह्यातील शिरुर (shirur, Pune) तालुक्यात रांजणगाव गणपती (Ranjangaon Ganpati) येथील अल्पवयीन मुलीला (Minor Girl) फुस लाऊन पळवून नेले आणि तिच्याबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध  ठेऊन वारंवार अत्याचार(Rape) केल्याची घटना ताजी असतानाच शिरुर तालुक्यातील आमदाबाद या गावात असाच काहीसा प्रकार घडला असून गावातीलच एका नराधमाने एका अल्पवयीन मुलीस जीवे मारण्याची धमकी देत सुमारे 5 महिने वारंवार अत्याचार केल्याची बाब समोर आली आहे. याबाबत पीडित मुलीच्या पालकांनी शिरुर पोलीस ठाण्यात (Shirur Police station) धाव घेत फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार कायद्याप्रमाणे (Child Sexual Abuse Act) गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली आहे. याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे कुटुंब आमदाबाद येथे वास्तव्यास असून  1 जून 2020 रोजी पीडित मुलगी गावातील मैत्रिणीच्या घरुन परत येत असताना गावातील मयुर सदाशिव थोरात (वय 23) याने पीडित मुलीला अडवले आणि "माझे तुझ्यावर प्रेम आहे. जर तू मला नाही म्हणालीस तर मी तुमचे दुकान पेटवून देईल" अशी धमकी दिली. यावर पीडित मुलीने घाबरून तिने त्याला होकार दिला. त्यानंतर दि. 29 जून 2020 रोजी सायंकाळी 7.30 च्या सुमारास पीडित मुलगी गावातून जात असताना मयुर थोरात याने तिला गावातील शाळेत बोलावून घेतले. त्यावेळेस गावातच राहणारा सागर बबन जगताप (वय 24) हा तिथं होता.  त्यावेळी मयुर थोरात याने पीडितेला धमकी देत बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला.  पीडित मुलगी आरडाओरडा करत असताना सागर जगताप याने तिचे दोन्ही हात धरत तोंड दाबून धरले. त्यानंतर थोरात याने "जर हे तू कोणाला सांगितलं तर तुला मारुन टाकीन" अशी धमकी दिल्याने पीडित मुलीने भीतीपोटी हा प्रकार कोणालाच सांगितला नाही. त्यानंतर 28 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 7.30 च्या सुमारास पुन्हा मयुर थोरात याने गावातील शाळेत पीडित मुलीला बोलावून घेतले आणि जीवे मारण्याची धमकी देत बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. त्यावेळेसही पीडित मुलगी आरडाओरडा करत असताना सागर जगताप याने पीडित मुलीचे दोन्ही हात धरुन तिचे तोंड दाबून धरले. या सर्व प्रकारामुळे पीडित मुलगी प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत होती. त्यामुळे मयुर थोरात आणि सागर जगताप यांना पाहिलं की, पीडित मुलगी प्रचंड घाबरत होती तसेच कधी कधी त्या दोघांना पाहून रडत होती. तसंच मयुर थोरात आणि सागर जगताप कायम त्या मुलीवर पाळत ठेवत होते. त्यानंतर काही दिवसांनी पीडित मुलीने धाडस करत तिच्या नातेवाईक महिलेला सदरची हकीकत सांगितली. दरम्यान, त्या महिलेने मुलीच्या आई-वडिलांना हा प्रकार सांगितला. नंतर आई-वडिलांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता मुलीने गेल्या 5 महिन्यांपासून होत असलेल्या अत्याचाराची सर्व कहाणी सांगितली. यावेळेस पीडित मुलीच्या पालकांनी तात्काळ शिरुर पोलीस ठाण्यात धाव घेऊन मयुर थोरात आणि सागर जगताप या दोघांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. त्यानंतर शिरुर पोलिसांनी भा द वि का 376, 506,34  या कलमा प्रमाणे बाल लैंगिक अत्याचार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करुन तात्काळ सूत्रे हलवत दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे हे करत आहेत. आरोपींनी या पूर्वीही केले आहेत असेच प्रकार या दोन्ही आरोपींनी गावात यापूर्वीही 5 ते 6 वेळा गावातील मुलींची छेडछाड करुन त्यांच्यावर अत्याचार केले. परंतु, आपल्या कुटुंबाची व मुलींची बदनामी होईल. या भीतीने पीडित मुलींनी व पालकांनी हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. त्यामुळे या आरोपींचे धाडस वाढत गेले. या दोन नराधमांनी गावातील अनेक मुलींना धमकी देऊन त्यांच्यावर अत्याचार केलेले आहेत. परंतु, बदनामीच्या भीतीने कोणीही पोलीस ठाण्यात जाण्याचं धाडस केल नाही अशी गावात दबक्या आवाजात चर्चा आहे. अनेकवेळा गावातील ग्रामस्थांनी या दोघांना समजही दिलेली होती. हे दोन्ही आरोपी गावाजवळच असलेल्या एका खाजगी साखर कारखान्यात कामाला आहेत. सदर पीडित मुलीचे कुटुंब गरीब असल्याने आरोपींनी त्याचा गैरफायदा घेतला. त्यामुळे या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी संतप्त प्रतिक्रिया गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Pune, Rape, Rape news, अत्याचार, बलात्कार, शिरूर

पुढील बातम्या