बलात्कारानंतर पीडितेचा समोर आला धक्कादायक वैद्यकीय रिपोर्ट, अल्पवयीन वयातच झाली गरोदर

बलात्कारानंतर पीडितेचा समोर आला धक्कादायक वैद्यकीय रिपोर्ट, अल्पवयीन वयातच झाली गरोदर

लॉकडाऊन असताना बलात्काराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका आरोपीने एका 15 वर्षाच्या किशोरवयीन मुलीवर बलात्कार केला आहे.

  • Share this:

हमीरपुर (हिमाचल प्रदेश), 29 मे : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन असताना बलात्काराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका आरोपीने एका 15 वर्षाच्या किशोरवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे पीडित मुलगी आता गरोदर आहे. हे प्रकरण हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यातील आहे. हमीरपूर जिल्ह्यात सुमारे दोन महिन्यांपूर्वी पीडित मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. गुरुवारी पोलिसांनी ही माहिती दिली. उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने किशोरीवर बलात्कार केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

पोक्सो कायद्याच्या कलम 6 अंतर्गत गुन्हा दाखल

स्थानिक वैद्यकीय महाविद्यालयात तिची वैद्यकीय तपासणी केली असता मुलगी गर्भवती असल्याचं समोर आलं. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 376 आणि 506 आणि पोक्सो कायद्याच्या कलम सहा अंतर्गत एफआयआर नोंदविला आहे.

पोलीस दलात कोरोनाचा धोका वाढला, गेल्या 24 तासांतील धक्कादायक आकडेवारी आली समोर

अस्वस्थ वाटल्याने पीडितेने सांगितलं आईला

पोलिसांनी सांगितलं की, पीडित मुलीने मंगळवारी तिला अस्वस्थ वाटल्यामुळे घटनेबद्दल तिच्या आईला सांगितले. तिची आई तिला स्थानिक वैद्यकीय महाविद्यालयात घेऊन गेली जेथे तिला गर्भवती असल्याचे समजले.

पुण्यातील अक्षय बोऱ्हाडे प्रकरणाला नवं वळण, FB व्हिडिओनंतर उमटले राजकीय पडसाद

आरोपी पीडितेला धमकावत असे

पीडित मुलीच्या आईने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत असे लिहिले आहे की, उत्तर प्रदेशमधील सहारनपूर इथला आरोपी मुलीला धमकवायचा. आणि याबद्दल कोणाला सांगितलं तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देत ​​असे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पुणे कोरोनानं हादरलं, कामगाराच्या अचानक मृत्यूनंतर आला धक्कादायक रिपोर्ट

First published: May 29, 2020, 1:13 PM IST
Tags: rape cases

ताज्या बातम्या