जशपूर, 11 मे : छत्तीसगढ राज्यातील जशपूर
(Jashpur Chhattisgarh) येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोकडा पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या 30 वर्षीय तरुणीने तक्रार दाखल केला आहे. 10 मे रोजी दाखल केलेल्या अहवालात मुलीने धक्कादायक माहिती दिली आहे. मुलीने पोलिसांना सांगितले की, तिच्या घरी चडिया मनोरा गावात राहणारा भूपेंद्र प्रसाद हा 2015 ते 2019 या काळात घरजावई म्हणून राहत होता. या चार वर्षांत भूपेंद्रने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अनेकवेळा तिच्यासह दुश्कर्म केले होते.
पोलिसात दिलेल्या लेखी तक्रारीनुसार, 2015 ते 2019 या कालावधीत मुलगी तीन वेळा बलात्कार केल्यामुळे गरोदर राहिली होती. परंतु शारीरिक दुर्बलतेमुळे तीनवेळा अनुक्रमे पहिल्यांदा 6व्या महिन्यात आणि दुसऱ्या-तिसऱ्या वेळा 09व्या महिन्यात गर्भपात झाला होता. मुलीची आई अनेकदा आरोपी भूपेंद्र प्रसादच्या पालकांकडे लग्नाचा प्रस्ताव घेऊन गेली होती. मात्र, त्यांनी टाळाटाळ केली. दरम्यान, आरोपी भूपेंद्र प्रसाद याने मुलीच्या कुटुंबीयांवर मोटरसायकल विकत घेऊन देण्यासाठी दबाव आणला आणि दुचाकी खरेदी न केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. यादरम्यान तोही मुलीचे घर सोडून निघून गेला.
हे वाचा - Pune: बॉयफ्रेंडच्या भावाला वाचवण्यासाठी गर्लफ्रेंडचा खटाटोप, भोसरी एमआयडीसी पोलिसांकडून तोतया महिला पोलिसाला अटक
आरोपी होता दुसऱ्या लग्नाच्या तयारीत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीला माहिती मिळाली की, आरोपी भूपेंद्र प्रसाद दुसऱ्या मुलीशी लग्न करत आहे. यानंतर मुलीने आरोपीविरुद्ध कलम 376 (2), (एन), 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला. 10 मे रोजी अहवाल दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासासोबतच आरोपींचा शोध सुरू केला. तक्रार दाखल केल्यानंतर काही तासांतच आरोपी घरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांचे पथक आरोपीला पकडण्यासाठी गेले. खबऱ्याकडून माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला पकडले. आवश्यक चौकशीअंती आरोपीला पोलिसांनी न्यायालयीन कोठडीवर कारागृहात पाठवले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.