पंढरपूर, 9 सप्टेंबर : तथाकथित महाराज मनोहर मामा भोसले यांच्या विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा (Sexual harassment) गुन्हा दाखल झाला आहे. मनोहर मामांच्या अटकेसाठी करमाळा पोलिसांचे स्वतंत्र पथक रवाना झाले आहे. अलीकडेच मनोहर मामा भोसले (Manohar Mama Bhosale) यांच्याविरोधात अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. उंदरगाव येथे मनोहर मामा भोसले यांचा बाळूमामा (Saint Balu Mala) यांच्या नावाने महत्व मंदिर आहे. या मठांमध्ये अनेक भाविक येतात या भाविकांकडून बाळूमामांच्या नावाने आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप सरपंच व सदस्यांनी केला होता. त्यानंतर आता आलेल्या वृत्तानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे.
यानंतर आता मनोहर मामा भोसले याच्यावर अनेक आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातच आता एका महिलेने लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा करमाळा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 376 2 n, 376 d, 354 385 व अंधश्रद्धा निर्मूलन कायदा कलम 3 नुसार गुन्हा दाखल केला आहे. यानंतर आता मनोहर मामा भोसले यांच्या अटकेसाठी पोलीस रवाना झाले आहेत.
हे ही वाचा-पुणे पुन्हा हादरलं! स्टेशन परिसरात फूटपाथवर झोपलेल्या 6 वर्षांच्या चिमुरडीवर रेप
संत बाळूमामाचा (Saint Balu Mala) अवतार असल्याचे सांगत फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले (Manohar Mama Bhosale) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोहर मामा भोसले याच्यासह त्याच्या दोन अन्य सहकाऱ्यांच्याविरोधात बारामती तालुका पोलीस (Baramati Taluka Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा देत त्यांनी फसवणूक केली. याप्रकरणी तिघांवर फसवणूकीसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा, जादूटोणा आणि उच्चाटन कायदा तसेच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pandharpur, Rape