तरुंगातून बाहेर आला बलात्काराचा आरोपी, पीडितेच्या घरी जाऊन चौघांना चाकून भोसकलं, आईचा मृत्यू

तरुंगातून बाहेर आला बलात्काराचा आरोपी, पीडितेच्या घरी जाऊन चौघांना चाकून भोसकलं, आईचा मृत्यू

एका तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून तुरुंगात पाठवण्यात आलेल्या आरोपी सुटताच आधी पीडितेच्या घरी गेला आणि चार जणांवर चाकूंनी हल्ला केला.

  • Share this:

बुंदी (राजस्थान), 22 मे : एका गुन्ह्याची शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर आरोपीने धक्कादायक गुन्हा केला आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आरोपीने एक भयानक कृत्य केलं आहे. एका तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून तुरुंगात पाठवण्यात आलेल्या आरोपी सुटताच आधी पीडितेच्या घरी गेला आणि चार जणांवर चाकूंनी हल्ला केला, ज्यामध्ये पीडितेच्या आईचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यातील आहे.

बुंदी जिल्ह्यातील लाखेरी शहरात गुरुवारी पीडितेच्या कुटूंबावर बलात्काराचा आरोप केलेल्या आरोपीने चाकूने हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुकेश असं आरोपीचं नाव आहे. आरोपी मुकेशने पीडितेच्या घरी जाऊन पीडितेच्या डोळ्यात मिरची घातली, त्यानंतर तिच्यावर चाकूने हल्ला केला. चाकूच्या जखमांमुळे पीडितेच्या आईचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी वार करून पीडितेचा भाऊ आणि आजी जखमी झाले.

विकृती! वासनेची भूक भागवसाठी दफन केलेला मुलीचा मृतदेह काढला बाहेर, शरीरसंबंध ठेव

घटनेची माहिती मिळताच, शेजाऱ्यांनी चौघांना ताबडतोब स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं. जेथे पीडितेची आई बेबीबाई यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. त्याचवेळी जखमी झालेल्या तिघांवर, पीडिता तिची आजी आणि भावावर उपचार सुरू आहेत. सगळ्यात धक्कादायक म्हणजे घटनेनंतर आरोपीने त्याच्या स्वत: हाताच्या नसाही कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला अटकही करण्यात आली असून पोलिसांकडून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी मुकेशवर मृत महिलेच्या मुलीने भादंवि कलम 376 आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता.

कोरोनाचं संकट बाजूला राजकारण पेटलं, भाजपचं आंदोनला महाविकास आघाडीचं प्रत्यूत्तर

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी हल्लीच पीडित मुलीकडून बलात्काराच्या प्रकरणात मुकेशला अटक केली होती. हा आरोपी जामिनावर तुरुंगातून बाहेर आला आणि त्याने ही खळबळजनक घटना घडवून आणली. यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

वादळामुळे नुकसान झालेल्या बंगालला केंद्राकडून 1 हजार कोटीचं पॅकेज, मोदींची घोषणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 22, 2020 02:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading