पाटना, 12 नोव्हेंबर : बिहार (Bihar News) सरकार राज्यात पूर्णपणे दारूबंदीबाबत (Crime news) जेथे कठोर कारवाईंचा अवलंब केला जात आहे, तेथेच दारू तस्करदेखील नवनव्या क्लृप्त्या घेऊन येत आहेत. राज्यातील चार जिल्हे मुजफ्फरपुर, समस्तीपुर, गोपाळगंज आणि चंपारणच्या पश्चिम भागात तथाकथित विषारी दारू प्यायल्याने 40 हून अधिक जणांना मृत्यू झाला आहे. सांगितलं जात आहे की, तस्कऱ्यांकडून दारू आयात करण्यासाठी कोडिंगचा वापर केला जातो. (Ram means rum and Krishna means use of the name of the gods as a codeword by liquor smugglers)
मुजफ्फरपूरमध्ये दारू तस्करीसाठी देवांच्या नावाचा वापर केला जातो. एका तस्करने दिलेल्या माहितीनुसार, सर्व जिल्ह्यांमध्ये दारू तस्करीसाठी विविध कोडिंगचा उपयोग केला जातो. जो आठवडा वा 15 दिवसांना बदलतो. त्यामुळे पोलिसांना याबाबत माहिती मिळू शकत नाही. मुजफ्फरपूरमध्ये चौका-चोकांमध्ये दारू पिणाऱ्यांनी राम म्हटलं तर त्यांना रम पोहोचवली जाते. आणि कृष्ण म्हटले तर व्हिस्की दिली जाते. सांगितलं जात आहे की, छोटा डॉन आणि बडा डॉन म्हटल्यानंतर दारूच्या प्रमाणाविषयी कळतं. तस्कर सांगतात की या कोडिंगंमुळे पोलिसांकडून बचाव करणं शक्य होतं.
हे ही वाचा-नशेचा बळी! आठवीचा विद्यार्थी झाला कर्जबाजारी, निराशेतून संपवलं जीवनकोडवर्ड चवन्नी, अठन्नी....
गोपालगंज जिल्ह्यात ग्राहक आणि अवैध पद्धतीने दारू विकणाऱ्यांमध्ये चवन्नी-अठन्नी, अर्धा किलो दूध कोडवर्ध प्रसिद्ध आहे. चवन्नी म्हणजे 30 रुपयात विकली जाणारी 100 एमएल देशा पाऊच, तर अठन्नी म्हणजे 150 रुपयात विकली जाणारी दारू. तर पोलिसांची गस्त असेल तर आधा किलो दूध या कोडवर्डचा उपयोग केला जातो. यानंतर तस्कर अलर्ट होतात. काही दिवसांनंतर या कोडवर्डमध्ये बदल केला जातो. त्याशिवाय गोपाळगंजमध्ये उत्तर प्रदेशातून दारूची तस्करी होते. या राज्यातून सर्वाधिक दारू आणली जात असल्याचं सांगितलं जात आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.