जोधपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्याला बेदम मारहाण, VIDEO VIRAL

जोधपूर मध्यवर्ती कारागृहात कैद्याला बेदम मारहाण, VIDEO VIRAL

जोधपूरमधील कारागृहात कैद्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

जोधपूर, 17 नोव्हेंबर: देशातील सर्वात सुरक्षित कारागृहांपैकी एक असणारं जोधपूर मध्यवर्ती कारागृह. य़ा कारागृहात कैद्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे कारागृहात उघडपणे वापर करत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे कारागृहातील सुरक्षा यंत्रणा आणि तिथल्या प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

काही दिवसांपूर्वी फलौदी इथे टॉवरवर चढून आंदोलन करणाऱ्या युवकाला जोधपूर मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आलं. या कैद्याला इतर 4 कैद्यांनी मिळून बेदम मारहाण केली आहे. पीडित कैदी स्वत: जीव वाचवण्यासाठी पळत असल्याचं ह्या व्हिडिओत दिसतंय. मात्र 4 जण मिळून त्याला पकडून बेदम मारहाण करत असल्याचं समोर आलं आहे. त्याचा व्हिडिओ तयार करून कैद्याने सोशल मीडियावरही शेअर केला आहे. 'न्यूज 18 लोकमत' हा व्हिडिओ तिथलाच असल्याची खातरजमा करत नाही. मात्र सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असल्यानं हा प्रकार समोर आला आहे.

कारागृह प्रशासनाकडून मीठाची गुळणी

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर कारागृह प्रशासनाकडून मात्र कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास तयार नाही. या कारागृहात उघडपणे कैद्यांकडे मोबाईल असल्याचं समोर आलं आहे. त्याचसोबत कारागृहात चालणारी गुंडगिरी आणि प्रशासनाकडून दुर्लक्ष होतंय का असाही सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान हा व्हिडिओ जोधपूर मध्यवर्ती कारागृहातील नाही असेही कारागृह अधिकाऱ्यांकडून सांगितलं गेलं नाही. त्यामुळे प्रशासन गप्प राहात असल्यानं अधिकारी या घटनेला गप्प बसून साथ देतात का? असा सवालही उपस्थित केला जातोय.

Loading...

जोधपूर मध्यवर्ती कारागृहात उघडपणे मोबाईलच्या वापरापासून ते नशाकरण्यापर्यंत सर्व प्रकार दिवसाढवळ्या सुरु असल्याचा आरोप केला जात आहे. याआधी भरदिवसा कैदी नशा करताना, जुगार खेळतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे अधिकाऱ्यांवर अनेक सवाल उपस्थित होत आहेत. अधिकाऱ्यांनीही कैद्यांसोबत हात मिळवल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 17, 2019 03:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...