भररस्त्यात गुंडगिरी; बेदम मारहाणीचा Video व्हायरल झाला तरी पोलिसांकडून दुर्लक्ष

भररस्त्यात गुंडगिरी; बेदम मारहाणीचा Video व्हायरल झाला तरी पोलिसांकडून दुर्लक्ष

एखाद्या मारहाणीच्या सिनेमात ( Action Cinema) मध्ये घडावा असा प्रसंग राजस्थानात प्रत्यक्षात घडलाय. चार तरुणांनी भर रस्त्यात एका तरुणाला मारहाण केली असून या घटनेचा व्हिडिओ (Video) चांगलाच व्हायरल (Viral) झालाय.

  • Share this:

जयपूर, 3 डिसेंबर : दोन तरुण रस्त्यात उभे असतात. इतक्यात समोरुन एक मोटारसायकल येते आणि त्यानंतर सर्वजण मिळून एका तरुणाला मारहाण करतात. एखाद्या मारहाणीच्या सिनेमात ( Action Cinema) मध्ये घडावा असा प्रसंग प्रत्यक्षात घडला आहे.या घटनेचा व्हिडिओ (Video) आता चांगलाच व्हायरल (Viral) झाला आहे.

राजस्थानातल्या चुरु या गावात सिनेमात शोभावा असा हा प्रसंग घडलाय. चुरुमधील राम मंदिराजवळ दोन तरुण बोलत उभे होते. इतक्यात एका मोटारसायकलवरुन तीन तरुण तिथे आले आणि त्या सर्वांनी मिळून एकाला मारहाण केली. बंटी असे या पीडित तरुणाचे नाव आहे. या मारहाणीचे नेमके कारण अजून समजू शकलेले नाही.

या प्रकरणातील संतापजनक बाब म्हणजे आठ दिवस आधी गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिसांनी अजून कोणतीही कारवाई केलेली नाही. बंटीच्या परिवाराने या प्रकरणी उजीफा, आदिल कसाई यांच्यासह अन्य तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. तरुणांच्या या गुंडगिरीकडे पोलिसांनी मात्र दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे बंटीचा परिवार सध्या भीतीने जगत आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात गोंधळ उडाला आहे. लॉकडाऊनमध्ये क्राईमच्या घटनांमध्ये घट झाली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा देशातील विविध भागांमधील क्राईमचं प्रमाण वाढत असल्याचं दिसत आहे. सीसीटीव्हीमधून हा मारहाणीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आरोपींना पकडणं सोपं जाऊ शकतं. मात्र पोलिसांकडून याबाबत कारवाई केली जात नसल्याचा आरोप पीडित तरुणाच्या कुटुंबीयंनी केला आहे.

Published by: News18 Desk
First published: December 3, 2020, 6:40 PM IST

ताज्या बातम्या