शिक्षक-विद्यार्थी नात्याला काळीमा, दिव्यांग मुलाचा शिक्षिकेने छळ केल्याचा आरोप

शिक्षक-विद्यार्थी नात्याला काळीमा, दिव्यांग मुलाचा शिक्षिकेने छळ केल्याचा आरोप

शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना राजस्थानमध्ये घडली आहे.

  • Share this:

बूंदी, 30 जानेवारी : शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं हे इतर कोणत्याही नात्यापेक्षा पवित्र मानलं जातं. पण याच नात्याला काळीमा फासणारी घटना राजस्थानमध्ये घडली आहे. राजस्थानमधील बूंदी याठिकाणी एका शिक्षिकेनेच 7 वर्षीय दिव्यांग विद्यार्थ्याचा छळ केल्याचा आरोप केला जात आहे.

देवपुराच्या प्राथमिक शाळेतील शिक्षिकेने या दिव्यांग मुलाला पाण्याच्या टँकमध्ये टाकल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे. घाबरलेल्या अवस्थेत घरी पोहोचल्यानंतर या मुलाने पालकांना घडला प्रकार सांगितला. जेव्हा या मुलाचे पालक शाळेत पोहोचले तेव्हा मात्र या शिक्षिकेने शाळेला टाळं ठोकलं होतं, असा आरोप पीडित मुलाच्या पालकांनी केला आहे. त्यांनी युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव चर्मेश शर्मा यांच्यासोबत थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करत मुलाच्या पालकांनी शिक्षिकेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

चंद्रदीप सिंह यांचा दिव्यांग मुलगा देवपुरातील एका प्राथमिक शाळेत शिकतो. निव्वळ या मुलाने पुस्तकाला व्यवस्थित कव्हर न घातल्यामुळे शिक्षिकेचा संताप झाल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे. आधी या मुलाचे कपडे काढून त्याला मारहाण केली आणि त्यानंतर त्याला पाण्याने भरलेल्या टँकमध्ये उलटं लटकवण्यात आलं. टँकमधून बाहेर काढून तशाच भिजलेल्या अवस्थेत त्या बिचाऱ्या मुलाला घरी पाठवलं असा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. पीडित मुलगा घाबरलेल्या अवस्थेत घरी आल्यावर पालकांना घडला प्रकार समजला, मात्र शाळेत पोहचेपर्यंत शिक्षिका शाळेला टाळं लावून निघून गेली असल्याचं सिंह कुटुंबीय सांगतात.

(हेही वाचा : 7 वर्ष 182 तरुणींसोबत संभोग करून तयार केले MMS! उद्योगतींच्या मुलांना अटक )

शिक्षिकेचं हे वर्तन माणुसकीच्या विरोधात आहे, अशी प्रतिक्रिया युवक काँग्रेसचे नेते चर्मेश शर्मा यांनी दिली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी ए.यू. खान यांना निवेदन देऊन त्यांनी शिक्षिकेवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेबाबात तक्रार दाखल झाली असून, सगळ्या शक्यतांची पडताळणी करुनच तपास करण्यात येईल आणि त्यानंतर योग्य कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे

First published: January 30, 2020, 10:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading