चूरू, 23 सप्टेंबर : दारू पिऊन तमाशा आणि मारहाण करणाऱ्या पतीला वैतागलेल्या पत्नीनं त्याचा काटा काढला. दारू पिऊन पती खूप मारत असल्याचा दावा या महिलेनं केला. तर रोजच्या त्रासाला कंटाळून या महिलेनं आपल्या पतीचा गळा आवळून हत्या केली आहे. ही संपूर्ण घटना 24 तासांनी समोर आली. या मिलेनं पतीचा मृतदेह बेडमध्ये लपवून ठेवला आणि त्याची दुर्गंधी यायला लागल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी ही घटना समोर आणली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 10 दिवसांपूर्वी नीरज आपल्या पतीसोबत भांडून माहेरी आली होती. निर्मल घरात सर्वात लहान भाऊ होता. त्याचं 2011 मध्ये नीरज नावाच्या मुलीसोबत विवाह झाला होता. तीन भाऊ वेगवेगळे राहात होते. निर्मल आणि नीरज शेतात असलेल्या घरात राहात होते. निर्मल खूप दारू पिऊन आपल्या पत्नीला मारहाण करायचा. त्याला त्रासाला कंटाळून नीरजनं धाडस केलं आणि त्याचा खेळ संपवला.
हे वाचा-पूनम पांडेला पतीने केली मारहाण, लग्न...हनिमूनच्या 21 दिवसांनंतर झाली अटक
20 सप्टेंबरला रात्री नीरज आणि निर्मल पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झालं. तेव्हाही निर्मल नशेत होता. वडिलांनी त्यांच्या भांडणात मध्यस्ती करण्याचा खूप प्रयत्न केला मात्र ऐकायला तयार नव्हते तेव्हा वडिलांनी दोघांनाही धमकी देऊन आपल्या खोलीत पाठवून दिलं. त्यानंतर नीरजनं रोजच्या त्रासाला कंटाळून दोरीनं आपल्या पतीचा गळा आवळला आणि त्याला संपवलं. दरम्यान ही घटना राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील हमीरवास पोलीस ठाणा क्षेत्रात घडल्याची माहिती मिळाली आहे.
हे वाचा-मुंबई: 12 वर्षात चोरल्या 108 सोनसाखळ्या, CCTVने केला खेळ खल्लास
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार नीरजचा मृतदेह शेतातील घरात सापडला आहे. तर नीरजनं एकट्यानं नाही तर या हत्येमध्ये आणखीन कुणाचातरी हात असल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. त्याच्या गळ्यावर दोरीने गळा आवळ्याचे निशाण दिसत होते याशिवाय छाती काळीनिळी पडली होती. मृतदेह घरात 24 तास पडून राहिल्यानं त्याला दुर्गंधी येऊ लागली. या प्रकरणी पोलिसांनी माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.