Home /News /crime /

ऑक्सिजन अभावी 200 रुग्णांचा मृत्यू झाल्याची Fake FB पोस्ट टाकणं पडलं महागात

ऑक्सिजन अभावी 200 रुग्णांचा मृत्यू झाल्याची Fake FB पोस्ट टाकणं पडलं महागात

Facebook Representative Image

Facebook Representative Image

अफवा पसरवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून आरोपी या प्रकरणी आता माफी मागत आहे.

    जोधपूर, 14 एप्रिल: राजस्थान (Rajasthan)मधील जोधपूर (Jodhpur) येथील एका रुग्णालयात 200 रुग्णांचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती असलेली पोस्ट सोशल मीडियात (Social Media) शेअर करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एमडीएम रुग्णालयात ऑक्सिजन संपल्याने 200 रुग्णांचा मृत्यू झाल्याची फेक फेसबूक पोस्ट (Fake Facebook post) आरोपीने केली होती. या प्रकरणी अफवा पसरवल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पंडित अभिषेक जोशी नावाच्या तरुणाने फेसबूक पेजवर जोधपूर येथील एमडीएम रुग्णालयात ऑक्सिजन अभावी 200 रुग्णांचा मृत्यू झाल्याची फेक पोस्ट व्हायरल केली होती. या प्रकरणी महामंदिर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. वाचा : Covid 2nd Wave: भारतात एका दिवसात 3 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होऊ शकते, तज्ञांचा दावा पोलिसांनी अटक केल्यावर आरोपी अभिषेक जोशी याला आता आपल्या कृत्याचा पश्चाताप होत आहे. आरोपी अभिषेक आता या प्रकरणी माफी मागत आहे आणि आपण ही पोस्ट केली नाही तर आपल्याला इतरांकडून ही पोस्ट आली होती ती केवळ शेअर केली असं सांगत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वत्र भयावह वातावरण आहे. अशा परिस्थितीत नागरिकांमध्येही भीती आहे आणि यावेळी अशा प्रकारच्या खोट्या माहिती पसरवणं अभिषेक जोशी याला चांगलंच महागात पडलं आहे. अभिषेकने ही पोस्ट केल्याने त्याला कुणी रोखलं किंवा विचारलं नाही असं नाहीये. पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत आणि त्यात म्हटलं आहे, भावा ही बरोबर बातमी आहे का? चुकीची माहिती असेल तर तुला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अशाच प्रकारे अभिषेक याला अनेकांनी विचारणा केली. त्यानंतर अभिषेकने ही पोस्ट डिलीट केली. मात्र, अशा अफवा पसरवल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
    First published:

    Tags: Coronavirus, Crime, Rajasthan

    पुढील बातम्या