जयपूर, 21 जानेवारी : राजस्थानच्या (Rajasthan News) क्राइम वर्ल्डमध्ये (Crime World) कुख्यात 'लेडी डॉन' (Lady Don) हिला शेवटी पोलिसांनी अटक केली आहे. करोलीची 19 वर्षीय रेखा मीना हिला डिस्को आणि दारू पार्टीची आवड आहे. आणि गँगवाॅरमधील रेखा फेसबुकवर लाइव्हमध्ये सर्वांसमोर धमकी देत होती.
सिगारेटचे झुरके घेत रेखा इतक्या घाणेरड्या शिव्या देत होती, की ऐकणाऱ्याचे कान फाटतील. पोलिसांनी अटक केलेल्या रेखाचा भूतकाळ तपासून पाहिला तर धक्कादायक गोष्टी समोर आल्या.
टोडाभीममध्ये राहणाऱ्या रेखाच्या आईचा मृत्यू ती लहान असतानाच झाला होता. गावात वडील शेती करून कुटुंबाचं पालन-पोषण करीत होते. जयपूरच्या जगतपुरामध्ये राहून तिचं शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती गुन्हेगारी क्षेत्रात गेली. रेखा आपल्या विरोधी गटाला फेसबुक लाइव्हवरुन शिव्या आणि धमकी देते. जोपर्यंत ती लाइव्ह असते तोपर्यंत कोणी काहीच बोलू शकत नाही. विरोधी गटातही तिची भीती आहे. करोली जिल्ह्यात लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना लेडी डॉनबद्दल माहिती आहे.
हे ही वाचा-सोलापूर: बहिणीची बदनामी नाही झाली सहन; मेहुण्याने भाऊजीला दिली भयंकर शिक्षा
सोशल साइटवरही रेखाचे फॉलोअर्स काही कमी नाहीत. सोशल साइटवर तरुणांमध्ये तिची क्रेझ आहे. ती स्वत: देशभरात फिरते आणि प्रवासाचे रील्सही शेअर करते. रेखाने आपल्या टोळीसह एकाच्या घरावर हल्ला केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी अनुराज जो रेखाचा सोबती आहे तो आपल्या काही साथीदारांसह हिस्ट्रीशीटर पप्पू मीणा याच्या घरी गेला होता. यानंतर अनुराजने पप्पूच्या पोटात गोळी मारली होती. आणि त्याच्या कुटुंबासोबत मारहाण केली होती. 1 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी या प्रकरणात फरार अनुराजला अटक केली होती. त्यावेळी तपासात रेखाच्या सांगण्यावरुन अनुराजने असं कृत्य केलं होतं. तेव्हापासून पोलीस रेखाचा शोध घेत होती. शहरात गँगवॉर वाढवण्यात रेखाचा हात असल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे तिला अटक करणं गरजेचं होतं असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.