मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पहिली पत्नी वेळीच घर सोडून निघून गेली, मात्र दुसरीचा झाला दुर्देवी अंत!

पहिली पत्नी वेळीच घर सोडून निघून गेली, मात्र दुसरीचा झाला दुर्देवी अंत!

महिलेचंही हे दुसरं लग्न होतं. लग्नाला अवघे 4 महिनेच झाले होते.

महिलेचंही हे दुसरं लग्न होतं. लग्नाला अवघे 4 महिनेच झाले होते.

महिलेचंही हे दुसरं लग्न होतं. लग्नाला अवघे 4 महिनेच झाले होते.

  • Published by:  Meenal Gangurde

कोटा, 18 नोव्हेंबर : राजस्थानमधून (Rajasthan News) एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. येथे पतीने लग्नाच्या चार महिन्यानंतर पत्नीची हत्या केली. यानंतर मुलीच्या माहेरच्या मंडळींना फोन करून सांगितलं की, तुमच्या मुलीने आत्महत्या (Suicide) केली आहे. तपासादरम्यान या प्रकरणातील नेमकं कारण समोर आलं. जे वाचून तुम्हालाही धक्का बसेल. (rajasthan Husband killed his second wife)

करारात लिहिल्या होत्या या गोष्टी..

ही घटना कोटा जिल्ह्यातील इटावा पोलीस ठाणे हद्दीतील आहे. येथे आरोपी पती कुलदीपने पत्नी पिस्ता बाई हिची हत्या केली. चार महिन्यांपूर्वी दोघांचं लग्न झालं होतं. दोघांचंही हे दुसरं लग्न होतं. पहिली पत्नी तरुणाला सोडून निघून गेली होती. दुसरीकडे महिलेचा पहिला पतीही तिला सोडून निघून गेला होता. यानंतर दोघांनी जुलै महिन्यात लग्नगाठ बांधली. त्यांनी दुसऱ्या लग्नाबाबत आपल्या करारात बऱ्याच गोष्टी लिहिल्या होत्या.

मध्य रात्री पत्नीची केली हत्या

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, महिलेला लग्नात तिच्या माहेरच्या मंडळींनी काही दागिने दिले होते. जे ती वडिलांच्या घरीच सोडून आली होती. यावरुन तिचा पती तिच्यासोबत वाद करीत असे. इतकच नाही तर दागिन्यांवरुन तिला मारहाणदेखील करीत असे. मंगळवारी रात्री साधारण 12 वाजेदरम्यान त्यांच्यामध्ये वाद झाला आणि आरोपीने रागाच्या भरात पत्नीचा गळा आवळला. यातच महिलेचा मृत्यू झाला.

हे ही वाचा-लग्नाच्या पूर्वसंध्येला रंगलेल्या हळदीत धडकले पोलीस आणि मग...

त्या दिवशी आरोपी आणि त्याच्या पत्नीशिवाय घरी कोणीच नव्हतं. कुलदीपचे वडील शेतावर गेले होते. याचा फायदा घेत आरोपीने पत्नीची हत्या केली. यानंतर पत्नीचे माहेरचे आणि पोलिसांना तिने आत्महत्या केल्याचं सांगितलं. मात्र महिलेच्या कुटुंबीयांनी ही बाब मान्य केली नाही. शेवटी तपासानंतर आरोपीने आपला गुन्हा कबुल केला. याशिवाय महिलेच्या शरीरावर मारहाणीचे व गळा आवळल्याच्या खुणाही सापडल्या.

First published:

Tags: Murder, Rajasthan, Wife and husband