जोधपुर, 20 जानेवारी : राजस्थानमधील (Rajasthan News) जोधपुरच्या रातानाडा पोलीस ठाणे हद्दीत गोंधळ उडाला. या प्रकरणात माजी मंत्र्याच्या सूनेला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पशु रुग्णालयात एका आजारी श्वानाच्या (डॉग) मृत्यूनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण आणि गोंधळ केल्या प्रकरणात माजी दिवंगत मंत्र्यांच्या सुनेला पोलिसांनी (Crime News) अटक केली आहे. पोलीस कमिश्नरेटचे सहाय्यक पोलीस आयुक्त (माजी) देरावर सिंहने सांगितलं की, या प्रकरणात आरोपी महिलेला अटक करण्यात आलं आहे.
माजी मंत्र्यांची सून आजारी कुत्र्याला घेऊन आली होती रुग्णालयात
विशेष म्हणजे सोमवारी सायंकाळी दिवंगत माजी मंत्र्यांच्या सुनेने आजारी कुत्र्याला उपचारासाठी रुग्णालयात आणले होते. येथे हा कुत्रा मेला. यानंतर महिलेने रुग्णालयात एकच गोंधळ घातला. महिलेवर डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. यानंतर एक महिला डॉक्टरने राजस्थान सरकारचे माजी मंत्र्याच्या सूनेविरोधात आणि पुत्राच्या विरोधात राजकार्यात अडथळा आणणे आणि मारहाणीची तक्रार दाखल केली.
हे ही वाचा-1.65 कोटींची सोन्याची बिस्कीटं लपवली पोटात; अधिकाऱ्यांनी घेतलं ताब्यातकोविड चाचणीच्या प्रतीक्षेत
आरोपी महिलेला सायंकाळी उशिरा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. येथे सुनावणी करताना न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिला न्यायालयीन कोठडीत कारागृहात पाठवण्याचे आदेश दिले. यानंतर आरोपी महिलेची कोविड तपासणी करण्यात आली. सध्या तपास अहवाल येईपर्यंत त्याला पोलीस ठाण्यात ठेवण्यात येणार असून, निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर तिची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात येणार आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.