प्रियकराच्या मदतीनं पतीला दिला वीजेचा करंट, बेडरूममध्ये मृतदेहाजवळ झोपून काढली रात्र

प्रियकराच्या मदतीनं पतीला दिला वीजेचा करंट, बेडरूममध्ये मृतदेहाजवळ झोपून काढली रात्र

प्रियकराच्या मदतीनं वीजेचा करंट देऊन पतीचा काटा काढला आणि...

  • Share this:

बाडमेर, 09 जुलै: प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं पतीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या प्रेमात अडसर बनलेल्या पतीला संपवण्याचा डाव पत्नीनं रचला. पतीला आधी झोपेच्या गोळ्या आणि नंतर वीजेचा शॉक देऊन हत्या करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली. मात्र घरच्यांना या हत्येचा सुगावाही नव्हता 15 दिवसांनी हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानं कुटुंबीयांनाही धक्क बसला आहे. राजस्थानच्या बाडमेर इथे ही घटना समोर आली आहे.

प्रेमातला काटा पत्नीनंच दूर केला, काय आहे प्रकरण

पप्पू देवीचे गावातील एक व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. याची माहिती पतीला मिळताच घाबरलेल्या पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीला कायमचं संपवलं. आधी पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि झोपवलं त्यानंतर प्रियकराच्या मदतीनं वीजेचा करंट देऊन हत्या केली. रात्रभर महिला आपल्या पतीच्या मृतदेहाजवळ झोपून राहिली.

हे वाचा-पत्नीची हत्या करून पती फिरत होता दुचाकीवर, पोलिसांनी पकडल्यावर धक्कादायक खुलासा

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पत्नीनं आपला नवरा विजेचा कंरट लागून गेल्याचा कांगावा सुरू केला. पोलिसांनीही घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती पाहिली आणि शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवला. घरच्यांनीही वीजेचा करंट लागून आपला मुलगा गेल्याचा शोक व्यक्त केला आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

हे वाचा-पहिल्यांदाच कोरोनाचं नवं रुप समोर, 4 वेळा टेस्ट करूनही रिपोर्ट निगेटिव्ह पण...

या सगळ्यात दरम्यान भावाला आपल्या वहिनीवर संशय आला आणि त्यांचं बिंग फुटलं. कसून चौकशी केल्यानंतर हा अपघात नसून हत्या केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली. कसून चौकशी केल्यानंतर महिलेनं हत्या केल्याची कबूली दिली.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 9, 2020, 8:38 AM IST

ताज्या बातम्या