नागौर (राजस्थान), 9 जानेवारी: राजस्थानमधील (Rajasthan) नागौर जिल्ह्यात झालेल्या तरुणाच्या हत्येबाबत (Murder) खळबळजनक माहिती समोर आली आहे. या तरुणाची त्याच्या बायकोनंच आपल्या प्रियकर भाच्याच्या मदतीनं हत्या केल्याचं उघड झालं आहे. हा तरुण त्यांच्या अवैध प्रेमसंबंधामध्ये अडथळा ठरत होता. त्यामुळे त्याच्या बायकोनं भाच्याच्या मदतीनं त्याची हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी 48 तासांच्या आत आरोपींना अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मुंडवाचा रहिवाशी असलेल्या सुरेशचा मृतदेह त्याच्या घराबाहेरील पलंगावर मिळाला होता. त्याची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात विशेष तपास पथकाची नेमणूक केली होती. त्यांनी मृत सुरेशची पत्नी किरण आणि त्याचा भाचा शंभूदास यांना अटक केली. या दोघांमध्ये बऱ्याच दिवसांपासून प्रेमसंबंध होते. यामध्ये सुरेशचा अडथळा होता.
अशी केली हत्येची योजना
किरण आणि शंभूदास या दोघांनी मिळून हत्येची योजना तयार केली होती. हत्येच्या दिवशी शंभूनाथ अंधाराचा फायदा घेत घरामध्ये लपून बसला. मध्यरात्री संधी साधून त्यानं शांत झोपलेल्या सुरेशची कुऱ्हाडीनं हत्या केली.
पोलिसांना होता संशय
या हत्येचं स्वरुप पाहता पोलिसांना घरातल्याच एखाद्या व्यक्तीचा यामध्ये सहभाग असल्याचा संशय होता. त्यामुळे पोलिसांनी त्यापद्धतीनं तपास करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी सुरुवातीला सुरेशच्या पत्नीची चौकशी केली. तिनं सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र पोलिसांच्या उलट तपासणीमध्ये अखेर गुन्हा मान्य केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime