मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /घृणास्पद! 15 वर्षीय मुलीने वडिलांना दिल्या झोपेच्या गोळ्या, मायलेकीने दांडक्यांनी मारून केली हत्या

घृणास्पद! 15 वर्षीय मुलीने वडिलांना दिल्या झोपेच्या गोळ्या, मायलेकीने दांडक्यांनी मारून केली हत्या

स्वत:च्या पतीला अत्यंत निर्दयीपणे मारल्याची घटना राजस्थानमधून समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिने यामध्ये आपल्या 15 वर्षीय मुलीलाही सामील करुन घेतलं.

स्वत:च्या पतीला अत्यंत निर्दयीपणे मारल्याची घटना राजस्थानमधून समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिने यामध्ये आपल्या 15 वर्षीय मुलीलाही सामील करुन घेतलं.

स्वत:च्या पतीला अत्यंत निर्दयीपणे मारल्याची घटना राजस्थानमधून समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिने यामध्ये आपल्या 15 वर्षीय मुलीलाही सामील करुन घेतलं.

    सवाई माधोपूर, 17 जुलै: राजस्थानातील सवाई माधोपूर भागातील पढाना गावात शुक्रवारी एक मृतदेह आढळून आला होता (Sawai Madhopur murder). या हत्येचं गूढ पोलिसांनी अवघ्या 24 तासांमध्ये उकललं आहे. या व्यक्तीची पत्नी आणि अल्पवयीन मुलीनेच मिळून त्याची हत्या केली होती, असा धक्कादायक खुलासा पोलिसांनी केला आहे (Daughter and mother killed father). हंसराज मीणा असे मृत व्यक्तीचे नाव होते (Hansraj Meena murder).

    पती-पत्नीमध्ये होते वाद

    हंसराज आणि त्याची पत्नी बरफी या दोघांमध्ये आधीपासूनच कायम भांडणं होत असायची. गेल्या दोन वर्षांपासून तर दोघांमध्ये संवादही बंद होता. या दोघांना एक अल्पवयीन मुलगीही आहे. भांडणामध्ये ही मुलगी नेहमी आईची बाजू घ्यायची. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला त्रास संपवण्यासाठी बरफीने एक योजना बनवली, आणि धक्कादायक बाब म्हणजे तिने यामध्ये आपल्या मुलीलाही सामील करुन घेतलं. दैनिक भास्करने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

    एक दिवस घरातच ठेवला मृतदेह, रक्त लपवण्यासाठी शेणानं सारवलं

    या मायलेकींच्या योजनेनुसार मुलीने हंसराजला झोपेची गोळी दिली, ज्यामुळे तो गाढ झोपला. यानंतर या मायलेकीने मिळून हंसराजच्या डोक्यात लाकडी दांडक्याने वार करुन त्याला ठार केले. यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा विचार करत त्यांनी तो घरातच लपवून ठेवला. तसंच, रक्ताचे डाग लपवण्यासाठी जमीन शेणाने सारवूनही घेतली (Cow dung used to hide blood). दुसऱ्या दिवशी त्यांना वाटलं, की मृतदेहाची दुर्गंधी आल्यास शेजाऱ्यांना याबाबत कळेल. त्यामुळे त्यांनी गुरुवारी रात्री तीनच्या सुमारास हंसराजचा मृतदेह घराच्या गेटजवळ आणून ठेवला, आणि आरडाओरडा सुरू केला. यानंतर हंसराजचे भाऊ बबलू यांनी अज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

    हे वाचा-मित्राच्या विधवा बहिणीवर ठेवला डोळा, रात्री अतिप्रसंगाचा केला प्रयत्न अन्...

    पोलीस जेव्हा घटनास्थळी पंचनाम्यासाठी आले, तेव्हा त्यांनी पाहिलं की घराच्या आतली जमीन शेणाने सारवली आहे. याबाबत कसून चौकशी केल्यानंतर बरफीने रक्ताचे डाग लपवण्यासाठी शेणाने जमीन सारवल्याचे सांगितले. तसेच आपल्या 15 वर्षाच्या मुलीसोबत मिळून ही हत्या केल्याचंही बरफीने पोलिसांसमोर कबूल केले.

    हे वाचा-दुहेरी हत्याकांडानं हादरलं पुणे; हॉटेल मालकानं केलेल्या हत्येनं खळबळ

    पोलीस अधीक्षक राजेश सिंह यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथक नेमले होते. यामध्ये तीन पोलीस अधिकाऱ्यांसह 15 कर्मचाऱ्यांचा समावेश होता. पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या 24 तासांच्या आतच या प्रकरणाचा उलगडा केला. यानंतर बरफी आणि तिची मुलगी या दोघींनाही पोलिसांनी अटक केली आहे.

    First published:
    top videos

      Tags: Crime, Crime news, Murder, Rajasthan